घरदेश-विदेशकाँग्रेसचा नेता सीतारामन यांना म्हणाला 'निर्बला'

काँग्रेसचा नेता सीतारामन यांना म्हणाला ‘निर्बला’

Subscribe

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची पुन्हा एकदा लोकसभेत जीभ घसरली.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. आज लोकसभेत कार्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या चर्चेबाबत बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख ‘निर्बला सीतारामन’ असा केला. या अगोदर चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ‘घुसखोर’ म्हटलं होत. यामुळे सत्ताधाऱ्यांनी संसदेत आक्षेप घेऊन काहीकाळ गोंधळ घातला.

लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्र्यांची खिल्ली उडवताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, ‘मला तुमचा नेहमीच आदर आहे. पण कधी कधी असं वाटतं की तुम्हाला निर्मला सीतारामन ऐवजी ‘निर्बला सीतारामन’ म्हणणं योग्य ठरेल का? कारण तुम्ही मंत्री आहात. परंतु आपण आपले विचार मांडता की नाही यावर मला शंका आहे.’

- Advertisement -

निर्मला सीतारामन या अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे, याविषयी बोलत होत्या. हे वॉर सुरू असल्यामुळे चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्याप्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत जवळचा देश असल्यामुळे या कंपन्या भारतात येऊ शकतात म्हणून सरकारने कार्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी निर्मला सीतारामन यांच्याबाबत वक्तव्य केलं.

- Advertisement -

याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ‘घुसखोर’ म्हटल्यामुळे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांनी फटकारले होते. प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘मी चौधरी यांनी केलेल्या विधानाचा निषेध करतो. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे घुसखोर आहे. जर काँग्रेसला काही जाणवत असेल तर त्यांनी माफी मागावी. अन्यथा मी सोनिया आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करेन.

यावेळी चौधरी यांनी पुन्हा जोरदार वक्तव्य केलं की, ‘हे लोक आमच्या नेत्या सोनिया गांधीजी यांना घुसखोर म्हणत आहे. जर आमचा नेता घुसखोर असेल तर तुमचा नेता घुसखोर आहे.’


हेही वाचा – लोकसभेचे सभापती भाजप खासदारावर भडकले; म्हणे, ‘केंद्र सरकार नळ बसवणार का?’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -