घरताज्या घडामोडीVaccination : लहान मुलांसाठी लसीचा प्लॅन तयार, सरकारी आदेशाची प्रतिक्षा - अदार...

Vaccination : लहान मुलांसाठी लसीचा प्लॅन तयार, सरकारी आदेशाची प्रतिक्षा – अदार पूनावाला

Subscribe

लहान मुलांसाठी देशात लवकरच कोरोनाविरोधी लस येण्याची शक्यता आहे. पुणे स्थित सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, येत्या सहा महिन्यांमध्ये लहान मुलांसाठी कोरोनाविरोधी लस आणण्यासाठीचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या नोवावॅक्स (Novavax) कंपनीची लस आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ही लस स्थानिक पातळीवर निर्माण आणि उत्पादन करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पूनावाला यांनी सांगितले आहे की, आम्हाला लहान मुलांमध्ये या गंभीर आजाराची लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे लहान मुलांशी संबंधित असे घाबरण्याचे सध्या कोणतेही कारण नाही. येत्या सहा महिन्यांमध्ये आम्ही लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून देणार आहोत. ही लस तीन वर्षापर्यंतच्या मुलांनाही उपलब्ध असावी, असाही उद्देश आहे. एका परिषदेत बोलताना पूनावाला यांनी सांगितले की, आमची कोकोवॅक्स लसीची चाचणी सुरू आहे. त्यामुळेच तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एक चांगला डेटा तयार झाला आहे. येत्या सहा महिन्यात लहान मुलांसाठीची लस उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लस देण्यात येत आहे. आतापर्यंत लहान मुलांवर लसीचा कोणताही साईड इफेक्ट दिसून आलेला नाही, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

लहान मुलांनाही कोरोनाविरोधी लस देण्याची गरज पूनावाला यांनी बोलून दाखवली आहे. लहान मुलांनाही कोरोनाची लस देणे गरजेचे आहे, कारण यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट नाही, असेही ते म्हणाले. कोरोनाविरोधी लस ही सुरक्षित आणि प्रभावी ठरलेली आहे. फक्त आता सरकारी आदेशाची प्रतिक्षा असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. सध्या देशव्यापी कोरोनाविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत १८ वर्षांहून अधिक वयोगटाच्या नागरिकांना लस देण्यात येते आहे. भारतात या वर्षी १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने आपत्कालीन वापरासाठी EUA च्या कोरोनाविरोधी लसीला परवानगी दिली आहे. १२ वयोगटाहून अधिक मुलांसाठी ही लस देणे शक्य आहे. ही लस अहमदास्थित zydus cadilla च्या ZyCovD ची लस आहे. पण या लसीला देशातील कोरोनाविरोधी लसीकरण अभियानात समाविष्ट करण्यात आलेले नाही. DCGI च्या तज्ज्ञ पॅनेलने १२ ते १८ वयोगटाच्या मुलांच्या लसीसाठी हैद्राबादस्थित भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला कोवॅक्सीनची शिफारस केली आहे. पण केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून बुस्टर डोसच्या चाचणीचा डेटा सादर, SECने केला खुलासा…

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -