घरदेश-विदेशमी पदवी पूर्ण करु शकले नाही; स्मृती इराणींची अखेर कबुली

मी पदवी पूर्ण करु शकले नाही; स्मृती इराणींची अखेर कबुली

Subscribe

स्मृती इराणी यांनी १९९१ मध्ये दहावी आणि १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. तसंच दिल्ली विद्यापीठाच्या ओपन लर्निंगच्या माध्यमातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करु शकले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री आणि अमेठी लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी मी पदवीधर नसल्याची कबुली दिली आहे. स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, मी दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण करु शकले नाही.

काय लिहिले आहे प्रतिज्ञा पत्रात?

स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. स्मृती इराणी यांनी गुरुवारी अमेठी लोकसभा मतदार संघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेवारी अर्ज भरताना त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये स्मृती इराणी यांनी १९९१ मध्ये दहावी आणि १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. तसंच दिल्ली विद्यापीठाच्या ओपन लर्निंगच्या माध्यमातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करु शकले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पदवीवरुन स्मृती इराणी टार्गेट

त्यावरुन स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरुन वाद निर्माण झाला आहे. विरोध पक्षाने स्मृती इराणी यांना त्यांच्या पदवीवरुन टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. कारण गेल्या निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीधर असल्याचे म्हटले होते असा विरोधकांनी दावा केला होता. स्मृती इराणी या पदवीधर नसून त्यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, आता स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीधर नसल्याचे स्पष्ट केले आहे.

स्मृती इराणींवर कर्ज नाही

दरम्यान, स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची मालमत्ता ४.७१ कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले आहे. इमारत आणि जमीन या स्वरूपात २.९६ कोटी रुपयांची तर ठेवी आणि रोख रकमेच्या आणि अन्य स्वरूपात एक कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे. तसंच इराणी यांच्याकडे १३ लाखांची गाडी आणि २१ लाखांचे दागिने आहेत. तसंच त्यांच्यावर कसलेही कर्ज नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर त्यांचे पती झुबिन यांच्याकडेही पाच कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -