घरदेश-विदेशदिवंगत मनोहर पर्रीकरांचा मुलगा बंडखोरीच्या तयारीत, भाजपकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढणार

दिवंगत मनोहर पर्रीकरांचा मुलगा बंडखोरीच्या तयारीत, भाजपकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढणार

Subscribe

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशसोबतच आता गोव्यातही निवडणुकीचा प्रचार तीव्र झालाय. भाजप आमदारांचे राजीनामे हे गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत, त्यामुळे प्रमोद सावंत यांच्यावरही प्रचंड दबाव वाढत आहे. खरे तर माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने बंडखोरीची तयारी केलीय.

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

- Advertisement -

उत्पल यांनी त्यांचे वडील मनोहर पर्रीकर यांची जागा असलेल्या पणजीतही घरोघरी प्रचार सुरू केलाय. 2019 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने या जागेवरून सिद्धार्थ श्रीपाद कुंकळणीकर यांना तिकीट दिले होते. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले आणि त्यांनी ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली. मात्र, 2019 मध्ये बाबूश यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले. एवढेच नाही तर बाबूश यांच्या पत्नी जेनिफर यांना सरकारमध्ये महसूल खात्याचा महत्त्वाचा पदभार देण्यात आला. बाबूश ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे, तर उत्पल यांना येथून निवडणूक लढवायची आहे.

मात्र ही जागा बाबूश यांच्याकडून उत्पल यांना दिल्यास गोव्यात पक्ष अडचणीत येण्याची भीती भाजपला आहे. खरे तर बाबूश हे पणजीचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी तळेगावच्या आमदार आहेत. त्यांचा मुलगा पणजीचा महापौर आहे. एवढेच नाही तर बाबूश यांचा प्रभाव आजूबाजूच्या 5-6 विधानसभा जागांवर आहे. उत्पल यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्पल यांच्या संभाव्य उमेदवारीवर सूचक विधान केलंय. ते म्हणाले, “ते एका नेत्याचे पुत्र आहेत म्हणून पक्ष कोणालाही तिकीट देऊ शकत नाही.” आता या जागेवरील कोण निवडणूक लढवणार याचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
—————————-
हेही वाचा- भुतानमध्ये चीनकडून करण्यात आलेल्या घुसखोरीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -