घरताज्या घडामोडी१५ मिनिटे उन्हात थांबा, करोना नष्ट होईल; केंद्रीय मंत्र्याचा अजब दावा

१५ मिनिटे उन्हात थांबा, करोना नष्ट होईल; केंद्रीय मंत्र्याचा अजब दावा

Subscribe

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी करोनाबाबत अजब विधान केलं आहे.

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. देशातही करोना फोफावत आहे. आतापर्यंत देशात करोनाचे १६६ रुग्ण आहेत. करोनावर अद्याप कोणत्याही पद्धतीचे औषध निर्माण झालेले नाही. मात्र, भारताच्या केंद्रीय मंत्र्याने मात्र करोनाच्या उपचारावर अजब दावा केला आहे. १५ मिनिटे उन्हात उभे राहिलात तर करोना नष्ट होईल, असा दावा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केला आहे.

सर्वांनी १५ मिनिटे ऊन घ्यायला हवे. ऊनामुळे शरिराला व्हिटॅमीन डी मिळते. यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते आणि करोनाव्हायरस सारख्या विषाणूंचा नाश देखील करतो, असे केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटले आहे. दरम्यान, करोनावरील लसीची चाचणी अमेरिकेने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: देशात करोनाचा चौथा बळी

राज्यात करोनाचा आकडा ४९ वर

महाराष्ट्रात करोना विषाणूचा दुसरा टप्पा सुरु असून आतापर्यंत ४९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर देशात करोनाचे १६६ रुग्ण आहेत. तर ३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -