Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आता कोव्हिशील्डसह Sputnik V लस होणार तयार, रशिया देणार लस...

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आता कोव्हिशील्डसह Sputnik V लस होणार तयार, रशिया देणार लस विकसिकरणाचे तंत्र

 ५० हून अधिक देशांमध्ये ही लस नोंदणीकृत

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी लसीकरण मोहिम संथगतीने सुरु आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी रशियाने मोठा पुढाकार घेतला आहे. रशियाने आपल्या Sputnik V लसीचे तंत्रज्ञान भारतातील सर्वात मोठी फार्मा कंपनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सामायिक करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आता कोव्हिशील्डसह Sputnik V लस तयार होणार आहे.

ड्रग कंट्रोलर इंडियाने दिली परवानगी 

यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) रशियाची Sputnik V लसीच्या चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली होती. यानंतर ड्रग कंट्रोलर इंडियाने परवानगी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कोव्हिशील्ड लसीचे उत्पादन घेतले जात आहे.

 ५० हून अधिक देशांमध्ये ही लस नोंदणीकृत

- Advertisement -

सध्या देशातील डॉ. रेड्डीज लॅबमध्ये Sputnik V लसीची निर्मिती केली जात आहे. आपत्कालीन वापरासाठी या लसीला डीसीजीआय (DGCI)ने मान्यता दिली आहे. या रशियन लसीचा वापर १४ मेपासून सुरू झाला असून आता ५० हून अधिक देशांमध्ये या लसीला नोंदणीकृत करण्यात आले आहे. एका अभ्यासानुसार, Sputnik V लसीची (दोन्ही डोसची) कार्यक्षमता ९७.६ टक्के आहे.

सीरमचे स्पष्टीकरण 

सीरमने यापूर्वीच स्पष्ट केले की, जूनपर्यंत १० कोटी कोव्हिशील्ड लसीचे डोस तयार होतील आणि ते पुरवण्यास सक्षम असतील. सीरममध्ये सध्य नोव्होवॅक्स लसीची देखील निर्मिती केली जात आहे. परंतु ही लस अद्याप अमेरिकेच्या नियामक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लसीकरणाची मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष्य यावर्षीच भारत सरकारने ठेवले आहे. आतापर्यंत देशात सुमारे २२ कोटी लस डोस देण्यात आले आहेत. जूनमध्ये सुमारे १२० दशलक्ष डोस उपलब्ध असतील, परंतु जुलै ते ऑगस्टपर्यंत दर महिन्यात २० ते २५ कोटी डोस उपलब्ध होतील.


IMD Monsoon 2021 : १० जूनपर्यंत ‘या’ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा


- Advertisement -

 

- Advertisement -