घरदेश-विदेशशबरीमाला मंदिर: श्रीलंकेच्या महिलेने केला मंदिर प्रवेश

शबरीमाला मंदिर: श्रीलंकेच्या महिलेने केला मंदिर प्रवेश

Subscribe

शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशावरुन पुराकरण्यात आलेल्या बंद दरम्यान झालेल्या आंदोलना दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर ३८ पोलिसांसह १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हिंसाचार प्रकरणी ७४५ जणांना अटक करण्यात आली आहे.

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे केरळमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अशाच गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता एका श्रीलंकन महिलेने अयप्पाचे दर्शन घेतले. शशिकला असे या महिलेचे नाव असून तिचे वय ४६ वर्ष असल्याचे सांगितले आहे. शशिकला नवऱ्यासोबत शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी शबरीमाला मंदिराच्या पवित्र १८ पायऱ्या चढल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला शबरीमाला मंदिर बंद होण्याआधी दर्शनसाठी आल्या होत्या. त्या १८ पायऱ्यांवरुन मंदिरामध्ये दाखल झाल्या ज्याला पथिनेत्तामपडी असे देखील म्हटले जाते.

- Advertisement -

१८ पवित्र पायऱ्या चढल्या

शशिकला यांनी सांगितले की, मी मंदिराच्या पवित्र १८ पायऱ्या चढले मात्र मला पुढे जाण्यास विरोध करण्यात आला. माझी मासिक पाळी बंद झाल्याचे माझ्याजवळ मेडिकल सर्टिफिकेट होते. ते मी पोलिसांना दाखवले. पोलिसांनी मला पोलीस बंदोबस्तात मंदिरात जाण्याची परवानगी दिली. माझ्यासोबत महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या. मात्र मंदिराच्या पवित्र १८ पायऱ्या चढल्यानंतर मला अडवण्यात आले. शशिकला यांच्याकडे श्रीलंकेचा पासपोर्ट होता त्यानुसार त्यांचा जन्म १९७२ साली झाला होता.

- Advertisement -

७४५ जणांना अटक

याआधी २ जानेवारीला ४२ वर्षाच्या बिंदू आणि ४४ वर्षाच्या कनकदुर्गा यांनी शबरीमाला मंदिरात प्रेवश करत अयप्पाचे दर्शन घेतले. त्यांनी पवित्र पायऱ्या न चढता दुसऱ्या मार्गाने मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतले. ज्याच्याविरोधात सध्या केरळ राज्यातील वातावरण तापले आहे. या महिलांनी प्रेवेश केल्यामुळे आंदोलन केली जात आहेत. या आंदोलना दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर ३८ पोलिसांसह १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हिंसाचार प्रकरणी ७४५ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.

राज्यपालांनी मागवला रिपोर्ट

बंद दरम्यान, जबरदस्ती दुकान बंद करायला लावणाऱ्या भाजपच्या ४ कार्यकर्त्यांना अज्ञात व्यक्तींनी भोकसले यामध्ये ते जखमी झाले आहेत. या आंदोलना दरम्यान गाड्यांची तोडफोड करण्यात आली. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या ७ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर केएसआरटीसीच्या ७९ बसची तोडफोड करण्यात आली. ३९ पोलिसांवर हल्ला करण्यात आला यामध्ये जखमी झालेल्या पोलिसांवर उपचार सुरु आहेत. हिंसाचार पाहता राज्यपाल पी सदाशिवम यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना कायदे व्यवस्थेवर रिपोर्ट मागवला आहे.

हेही वाचा – 

शबरीमाला मंदिर प्रवेश वाद; २५० अटकेत

शबरीमाला मंदिर: महिला प्रवेशाविरोधात केरळ बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -