घरताज्या घडामोडीदिल्ली : आंदोलनाला हिंसक वळण; सीलमपूर-जाफराबाद भागात पोलिसांवर दगडफेक

दिल्ली : आंदोलनाला हिंसक वळण; सीलमपूर-जाफराबाद भागात पोलिसांवर दगडफेक

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरात आंदोलने केली जात आहेत. गेल्या आठवड्यातच ईशान्य भारतात या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या हिंसक वळणाचे चक्रीवादळ आता दिल्लीत पोहोचले आहे. दिल्लीतील जामियानगर पाठोपाठ सीलमपूर-जाफराबाद भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या भागातील आंदोलकांनी दिल्ली परिवहन सेवेच्या तीन बसेसची तोडफोड केली आहे. याशिवाय आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.


हेही वाचा –#JamiaProtest: बॉलिवूड कलाकरांनी दिल्ली पोलीसांवर साधला निशाणा

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध कररण्यासाठी आज दिल्लीच्या सीलमपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा जाफराबाद येथे येताच आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी यावेळी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन आणखी जास्त चिघळले. काही आदोलकांनी दिल्ली परिवहन सेवेच्या तीन गाड्या पेटवून दिल्या. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवरही दगफेक केला. अखेर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून सीलमपूर येथून जाफराबादला जाणारा ६६ फूट रोड बंद केला. याशिवाय मेट्रोची सात स्थानके बंद करण्यात आली. वेलकम, जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, गोकुलपूर,शीवविहार आणि जौहरी एन्क्लेव्ह या मेट्रो स्थानकांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात दिल्लीतही हिंसक आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -