घरताज्या घडामोडीCAA विराधी आंदोलनाला हिंसक वळण; हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

CAA विराधी आंदोलनाला हिंसक वळण; हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

Subscribe

दिल्लीमध्ये आज सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये तुफन दगडफेक करण्यात आली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. चांदबांग येथील आंदोलनस्थळी सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस हेड कॉन्स्टेबल गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रतन लाल असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाने गेल्या तीन दिवसांपासून हिंसक वळण घेतले आहे. आज देखील या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हिंसक झलेल्या जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत हेड कॉन्स्टेबल रतन लाल गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

मौजपूरमध्येही पुन्हा एकदा दगडफेक

दिल्लीतील मौजपूरमध्ये देखील तणावपूर्ण वातावरण झाले आहे. या परिसरात देखील आज दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी कायद्याच्या समर्थनार्थ भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले होते. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -