घरदेश-विदेश'डोनाल्ड ट्रम्प'वर आरोप करणाऱ्या पॉर्नस्टारला अटक

‘डोनाल्ड ट्रम्प’वर आरोप करणाऱ्या पॉर्नस्टारला अटक

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बरोबर शारीरिक संबध असल्याचा दावा करणारी पॉर्नस्टार ‘स्टॉर्मी डॅनियल’ला पोलिसांनी नुकतेच अटक केली. ओहायो येथील स्ट्रिपक्लबमध्ये नाचताना स्टॉर्मीने गिऱ्हाईकाला स्पर्श करण्याची परवानगी दिल्याने ही कारवाई करण्यात आली. स्ट्रिपक्लबमध्ये नाचत असलेल्या महिलांना स्पर्श करणे अपराध असून जेनियलने कायदा मोडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लैंगिक संबध असल्याचा आरोप केल्यामुळे २०१६ मध्ये ही पॉर्नस्टार चर्चेत आली होती. लैंगिक संबध ठेवण्यासाठी डोनाल्ड यांनी १ लाख ३० हजार डॉलर्स देऊ केले असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोपाला फेटाळले होते.

असा घटला प्रकार

Stormi Daniels and Donald Trump

- Advertisement -

पॉर्नस्टार स्टॉर्मी कोलंबो येथील स्ट्रिपक्लबमध्ये मागील काही दिवसांपासून काम करत होती. या क्लबमध्ये डांन्सर होती. ओहियो कायद्यानुसार ठराविक स्ट्रिपक्लबमध्ये नाचणाऱ्या महिलांना स्पर्श करणे बेकायदेशीर आहे. अशा क्लब्समध्ये गिऱ्हाईकांना मुलींपासून दूर ठेवण्यासाठी बाऊंसर नेमले जातात. बुधवारी रात्री क्लबमध्ये आलेल्या काही गिऱ्हाईकांसमोर स्टॉर्मी डांन्स करत होती. त्यावेळी नशेत काही गिऱ्हाईकांनी तिला स्पर्श करण्याची विनंती केली. नाचणाऱ्या स्ट्रॉर्मीने त्यांना स्पर्शकरण्याची परवानगी दिली. ही माहिती पोलिसांनाम मिळताच तिला अटक करण्यात आले.

वकीलाचे ट्विट

- Advertisement -

या घटनेनंतर स्टॉर्मीचे वकील मायकल एवेनट्टी यांनी ट्विट केले आहे. या मागे राजकीय खेळी असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “गिऱ्हाईकाने कोण्त्याही वाईट भावनेने माझ्या अशिलाला स्पर्श केलेला नाही. आम्ही आरोपा विरोधात लढा देऊ. यापूर्वीही तिने स्ट्रिपक्लबमध्ये काम केलं आहे.” – मायकल

गुरुवारी पहाटे स्टॉर्मी पोलिसांच्या ताब्यात होती. लवकरच तिला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. स्टॉर्मी आतापर्यंत युएसमधील अनेक क्लबमध्ये काम करते. त्यामुळे तिला युएस मधील कायद्याचे ज्ञान आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांवर आरोप केल्यामुळे तिला अटक करण्यात आली का यावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -