घरताज्या घडामोडीधक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत १ हजार ८०० जणांचा कोरोनामुळे बळी

धक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत १ हजार ८०० जणांचा कोरोनामुळे बळी

Subscribe

गेल्या २४ तासाच अमेरिकेतील १ हजार ८१३ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने अमेरिकेत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. गेल्या २४ तासाच अमेरिकेतील १ हजार ८१३ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात अमेरिकेत सर्वाधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत १४ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना देखील अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यातील सर्व गर्व्हनरशी चर्चा केली आणि शाळा सुरू करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

अमेरिकेने लॉकडाऊनमधून देश सुरु करण्याची घाई करु नये. नाहीतर कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू शकतो.
– डॉ. एंथोनी फॉकी; अमेरिकेचे एक्सपर्ट

मात्र, याकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की, आमचा देश आता महासंकटातून बाहेर येत आहे. जर शाळा सुरु झाल्या नाहीत तर देश सुरु झालाय असे वाटणार नाही. दरम्यान, अमेरिका सरकारने कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन शोधण्यास वैश्विक युतीचा हिस्सा न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अमेरिका स्वतः वॅक्सीन शोधत आहे. theguardian.com च्या रिपोर्टनुसार, ट्रम्प सरकारने ‘अमेरिका फस्ट’ असा दावा केला आहे. यामुळे विश्वात कोरोनाशी लढण्यासाठी वॅक्सिन तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
दरम्यान, ब्रिटन, चीन, कनाडा, तुर्की, सऊदी अरब, जपानसह अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटना, गेट्स फाऊंडेशन आणि युरोपिअन कमिशनसोबत एकत्र येऊन वॅक्सीनवर काम करण्यासाठी वर्चुअल ग्लोबल समिटचे आयोजन केले होते. मात्र अमेरिकेकडून कुणीही यामध्ये सहभागी झाले नाही. या समेट दरम्यान वॅक्सीनकरता ८ बिलियन डॉलर फंड जमा करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -