सुखविंदर सिंह सुक्खू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिमलाच्या रिज मैदानावर दुपारी 1.50 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सुक्खू हे हिमाचलचे 15 वे मुख्यमंत्री बनले आहेत. सुक्खू यांच्यासह मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिमलाच्या रिज मैदानावर दुपारी 1.50 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सुक्खू हे हिमाचलचे 15 वे मुख्यमंत्री बनले आहेत. सुक्खू यांच्यासह मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्यासह काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 68 जागांपैकी 40 जागा जिंकल्या. हिमाचलमध्ये पंरपरा बदलाचा दावा करणार्‍या भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या. यामुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे एकहाती सरकार स्थापन झाले. (Sukhwinder Singh Sukkhu is the new Chief Minister of Himachal Pradesh)

सुक्खू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना राज्यात पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केली. पूर्वी लोक म्हणायचे की, काँग्रेस कोणत्याही राज्यात सत्तेवर येणार नाही, पण आज आम्ही भाजपचा ‘रथ’ रोखला आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री म्हणाले. सुक्खू यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ सोहळ्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार आल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आता आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे, जी लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतिभा वीरभद्र सिंह यांनीही पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे शिमल्यात स्वागत करत म्हटले की, आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला परत आणू, त्यावर राहुल यांनी त्यांचे अभिनंदन केले.

चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी

सुखविंदर सिंह सुक्खू हे चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत, मुकेश अग्निहोत्री पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. यापूर्वी सुखविंदर सिंह सुक्खू यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआयचे अध्यक्ष, शिमल्यातून दोन वेळा नगरसेवक, युवक काँग्रेस प्रमुथ आणि 2022 मध्ये निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.