घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; न्यायाधीशांचा याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; न्यायाधीशांचा याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर.गवई यांनी परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे त्यांच्याविरूद्ध सुरू केलेल्या विभागीय चौकशीविरोधात दाखल केलेल्या रिट याचिकेवर आज सुनावणी होणार होती. न्यायाधीश विनीत सरन आणि बी.आर.गवई यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाची यादी दुसऱ्या खंडपीठासमोर ठेवू असं म्हणतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

आज दुपारी एक ते दीडच्या सुमार परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू केली होती. परमबीर सिंह यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांमार्फत व्हावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर.गवई यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी आरोप केल्यानंतर अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात २८ एप्रिला अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे परमबीर सिंह यांच्यावर दाखल करण्यात आले होते. पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी केली जाणार आहे. पण राज्य सरकारने त्यांना तुर्तास दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारने २० मेपर्यंत सिंह यांना अटक करणार नसल्याची हमी दिली आहे. या सर्व खटल्यांच्या चौकशीची जबाबदारी महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त इतर राज्याकडे देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडीची धाड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -