घरदेश-विदेशCorona: अलिशान आयुष्य सोडून डॉक्टरांच्या मदतीला धावली 'ही' राजकुमारी

Corona: अलिशान आयुष्य सोडून डॉक्टरांच्या मदतीला धावली ‘ही’ राजकुमारी

Subscribe

वैद्यकीय कोर्स संपल्यानंतर सोफियाने कोरोना महामारीसारख्या युद्धात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती

राजकुमारी म्हटलं की आपल्या समोर तिचं सुंदर रूप, खूप श्रीमंती आणि तिचं आलिशान आयुष्य येतं. मात्र या आलिशान आयुष्याचा त्याग करत कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात तिने पुढाकार घेतला आहे. सध्या ही राजकुमारी हे आरामदायी जीवन न जगता समाजातील कोरोना रूग्णाच्या सेवेत व्यस्त आहे. नुकतेच आरोग्य प्रशिक्षण घेतलेल्या स्वीडनची राजकुमारी सोफिया देशातील आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या सहकार्याने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे.

- Advertisement -

लोकांची सेवा करण्याची व्यक्त केली इच्छा

राजकुमारी सोफियाने प्रिन्स कार्ल फिलिपशी लग्न केले असून स्टॉकहोम मधील सोफियामेट युनिव्हर्सिटीमधून तीन दिवसांचा वैद्यकीय कोर्स पूर्ण केला आहे. या विद्यापीठात मानद सदस्य म्हणून तिची नेमणूक करण्यात आली आहे. हा कोर्स संपल्यानंतर सोफियाने कोरोना महामारीसारख्या युद्धात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. रॉयल कोर्ट मारगरेथा थोरग्रेनकडून असे सांगण्यात आले की, गंभीर परिस्थितीच्या काळात राजकुमारीने आरोग्याच्या क्षेत्रात थोडेसे योगदान आपले दिले पाहिजे. यानुसार तिने आपली इच्छा देखील व्यक्त केली होती.

- Advertisement -

२०१५ साली बनली स्‍वीडनची राजकुमारी

स्वीडनची राजकुमारी सोफियाने २०१५ साली प्रिन्स फिलिपशी लग्न केले होते. त्यावेळी ती स्वीडनच्या रॉयल कोर्टची सदस्य देखील बनली. या शाही जोडीला प्रिन्स अलेक्झांडर आणि प्रिन्स गॅब्रिएल अशी दोन मुलं देखील आहेत. स्वीडन मध्ये १५ एप्रिल रोजी कोरोना व्हायरसमुळे १७० जणांचा मृत्यू झाला. यासह देशात अवघ्या ४८ तासांत मृतांची संख्या १०३३ वरून १२०३ इतकी वाढली असली तरी तेथील अधिकारी लॉकडाऊन करण्यास तयार नाही, असे सांगण्यात येत आहे.


CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा ३० हजार पार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -