घरदेश-विदेश1 डिसेंबरपासून तंबाखूजन्य उत्पादनांवर दिसणार नवा फोटो

1 डिसेंबरपासून तंबाखूजन्य उत्पादनांवर दिसणार नवा फोटो

Subscribe

देशात कॅन्सरचे रुग्ण वाढत असतानाही तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकिंगसंदर्भात नवा निर्णय घेतला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकिंगवर आता नव्या फोटोसह एक नवा मेसेज लिहिला जाणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार 1 डिसेंबरपासून आता तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या पॅकिंगवर नवा फोटो दिसणार आहे. मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आता त्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.

फोटोवर लिहिला जाणार हा मेसेज

- Advertisement -

सरकारच्या म्हणण्यानुसार, हा नवा फोटो 1 डिसेंबरपासून एका वर्षाच्या कालावधीसाठी वैध असेल. ज्यावर ‘तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो’ असे लिहिले जाईल. 1 डिसेंबर 2023 नंतर उत्पादित, आयात केलेले किंवा पॅकिंग केलेल्या तंबाखूजन्य उत्पादनांवरील फोटोत ‘तंबाखूच्या वापरामुळे कमी वयात मृत्यू होतो’ असा आरोग्याबाबत इशारा दिला जाणार आहे. मंत्रालयाने सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नियम 2008 ला 21 जुलै 2022 रोजी संशोधनाच्या माध्यमातून आरोग्याबाबत नवा इशारा दिला जाणार आहे.

- Advertisement -

नियम न पाळणाऱ्यांना दंड किंवा खावी लागणार जेलची हवा

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, तंबाखूजन्य उत्पादनांच्या पॅकिंगवर नियमांनुसार आरोग्यविषयक इशारा दिला नसल्यास त्यास सिगारेट किंवा कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादक, पुरवठादार, आयातदार किंवा वितरणदार तसेच यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतलेली कोणतीही व्यक्ती जबाबदार असेल. सरकारने सांगितले की, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्याचे पालन न करणाऱ्यास तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.


हेही वाचा : स्मृती इराणींच्या मुलीविरोधातील ट्विट काँग्रेसच्या तीन नेत्यांना भोवले; ट्विट 24 तासांत हटवण्याचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -