घरताज्या घडामोडीअजान सुरू होताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण, अन् सभास्थळावर...

अजान सुरू होताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण, अन् सभास्थळावर…

Subscribe

अन्यथा मशिदींसमोर जाऊन आम्ही हनुमान चालिसा वाचू अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं होतं. मात्र, याच प्रकरणाशी संबंधित आज आदित्य ठाकरेंच्या एका कृतीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्यात हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून येणारे अजान याबाबत वाद रंगला होता. राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवा असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. अन्यथा मशिदींसमोर जाऊन आम्ही हनुमान चालिसा वाचू अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं होतं. मात्र, याच प्रकरणाशी संबंधित आज आदित्य ठाकरेंच्या एका कृतीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिवसेनेला पुन्हा एकदा उभं करण्याकरता युवानेता आदित्य ठाकरे राज्यभर निष्ठा यात्रा काढत आहेत. आज त्यांनी चांदिवली भागात निष्ठा यात्रा काढली. या यात्रेला तुफान गर्दी झाली होती. आदित्य ठाकरेंनी या मेळाव्यात भाषणही केलं. भाषण सुरू असतानाच जवळच असलेल्या मशिदीवरील भोंग्यावरून ठाकरेंना अजान ऐकू आली. यावेळी त्यांनी आपलं भाषण थांबवून अजान संपण्याची वाट पाहिली. तसेच, सभास्थळीही शांतता निर्माण झाली. अजान पूर्ण संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंच्या या कृतीची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

- Advertisement -

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात रान पेटवले होते. मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर मशिदींसमोर जाऊन हनुमान चालिसा वाचू असा इशारा त्यांनी तत्कालीन सरकारला दिला होता. त्यानुसार अल्टिमेटम देऊनही मशिदींवरील भोंगे उतरले नसल्याने मनसेने अनेक मशिदींसमोर जाऊन हनुमान चालिसाचं पठण केलं होतं. यावरून पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकडही केली होती.

दरम्यान, याच काळात राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे उत्तरसभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंचं भाषण सुरू असताना तिथे अचानक अजानचा आवाज सुरू झाला. यावेळी त्यांनी हे अजान थांबवा अन्यथा पुढे काय होईल हे सांगू शकत नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी पोलिसांना दिला होता.

- Advertisement -

नरेंद्र मोदींनीही थांबवलं होतं भाषण

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजान सुरू होताच आपलं भाषण थांबवलं होतं. २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान ते मिदनापूर जिल्ह्यात होते. ते तिथे एका रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी अचानक नरेंद्र मोदी शांत बसले. जवळच असलेल्या मशिदमध्ये अजान सुरू असल्याने मोदी शांत बसले हे तिथल्या जमावाला जेव्हा समजलं तेव्हा साऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. २०१७ मध्येही गुजरातमध्ये असाच प्रकार घडला होता. तेव्हा त्यांनी आपलं भाषण थांबवलं होतं. २०१८ मध्येही भाजप मुख्यालयात भाषण सुरू असताना अजान सुरू झाल्याने नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण थांबवलं होतं.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -