घरताज्या घडामोडीचीनने डागली 11 डोंगफेंग क्षेपणास्त्रे, जपानमध्ये पडल्याने दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण

चीनने डागली 11 डोंगफेंग क्षेपणास्त्रे, जपानमध्ये पडल्याने दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण

Subscribe

चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी चीनकडून एक पाऊल पुढे टाकत 11 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. तैवान सरकारने याला दुजोरा दिला आहे. चीनकडून ही क्षेपणास्त्रे त्यांच्या आजूबाजूच्या भागाच्या दिशेने डागण्यात आली आहेत.

चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी चीनकडून एक पाऊल पुढे टाकत 11 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. तैवान सरकारने याला दुजोरा दिला आहे. चीनकडून ही क्षेपणास्त्रे त्यांच्या आजूबाजूच्या भागाच्या दिशेने डागण्यात आली आहेत. परंतु, या क्षेपणास्त्रांचे लँडिंग जपान होत असल्याचे समजते.

जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, ‘चीनने डागलेली पाच क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडली आहेत. ही बाब गंभीर असून, देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. तसेच, लोकांच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करू शकत नाही’, असे या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

चीनची ही कारवाई देखील चिंतेत टाकणारी आहे. कारण बुधवारी तैवानच्या हवाई क्षेत्रात 27 चीनी लढाऊ विमाने दिसली होती. त्यामुळे तैवानने आपली क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रिय केली. आता त्या संघर्षानंतर दोन्ही देश गुरुवारी पुन्हा आमनेसामने आले आहेत. लष्करी सरावाच्या नावाखाली चीन तैवानला सतत इशारे देत आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने तैवानला चिथावणी दिली आहे. चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीत डागण्यात आली आहेत. चीनने सुमारे 2 तासात 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – तैवानवर चीनकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला; जल आणि हवाई क्षेत्रातून हल्ल्याला सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -