घरताज्या घडामोडीAfghanistan: दाढी कापण्यावर तालिबानने घातली बंदी; सलूनच्या बाहेर लावली नोटीस

Afghanistan: दाढी कापण्यावर तालिबानने घातली बंदी; सलूनच्या बाहेर लावली नोटीस

Subscribe

अफगाणिस्तानवर कब्जा करून तालिबानला एक महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पूर्वीप्रमाणे प्रशासन चालवले जाणार नाही, असे म्हटले होते. मात्र अफगाणिस्तानमध्ये असे काही चित्र दिसत नाही आहे. कब्जा केल्यापासून तालिबानचा क्रूर चेहरा दिसू लागला आहे. स्वतः दिलेले आश्वासन खोडून तालिबान आता पूर्वीप्रमाणे वागताना दिसत आहे. महिलांना बुरखा घालण्यास सक्ती केल्यानंतर आता अफगाण पुरुषांना दाढी करण्यास सक्त मनाई केली आहे. दाढी केल्यास शरिया कायद्यानुसार शिक्षा होईल असा तालिबानने फर्मान काढला असून प्रत्येक सलूनच्या बाहेर नोटीसा लावल्या आहेत.

तालिबानने काढलेल्या नव्या नियमांनुसार इस्लामिक कायद्या अंतर्गत पुरुषांना दाढी, केस ठेवावे लागणार आहेत. काही माध्यमांच्या माहितीनुसार, तालिबानकडून हेलमंत प्रांताच्या सलूनमध्ये अशाप्रकारच्या नोटीस लावल्या गेल्या आहेत. सलून मालकाने सांगितले की, अमेरिकन स्टाईलमध्ये केस आणि दाढी कापण्यास बंद करायला आम्हाला सांगितले आहे. तसेच इस्लामिक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. या नोटीस विरोधात तक्रार करण्याचा अधिकार नाही आहे. शिवाय अफगाणिस्तानमध्ये इतर भागांमध्ये देखील अशा घटना घडत आहेत. त्या ठिकाणच्या सलूनवर जाऊन नव्या फर्मानाबद्दल सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Viral Photo: महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांनी केली बेदम मारहाण

१९९६ पासून ते २००१ पर्यंत प्रशासन दरम्यान तालिबानने कट्टर इस्लामिक कायदा म्हणजे शरिया कायद्याचे पालन केले होते. परंतु सत्ता गेल्यानंतर या नियमात सूट दिली गेली. सलूनमध्ये कोणत्याही प्रकारे केस आणि दाढी करण्यास स्वतंत्र होते. एवढेच नाही तर अफगाण पुरुष क्लिन शेव देखील करत होते. परंतु आता पुन्हा एकदा पुरुषांना दाढी वाढवण्याचा फर्मान सुनावला गेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bharat Bandh Protest: भारत बंद आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -