घरदेश-विदेशपायावरील टॅट्यूवरुन तमिळ अभिनेत्रीच्या हत्येचा उलगडा; पतीला अटक

पायावरील टॅट्यूवरुन तमिळ अभिनेत्रीच्या हत्येचा उलगडा; पतीला अटक

Subscribe

अभिनेत्री संध्याच्या पायावरील टॅट्यूवरुन तिच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

चेन्नई पोलिसांनी तामिळ अभिनेत्री संध्याच्या हत्येचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अभिनेत्री संध्याच्या हत्येप्रकरणी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव बालकृष्णन (५१ वर्ष) असे आहे. बुधवारी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी असा दावा केला आहे की, संध्याच्या पतीनेच तिची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केले. असे सांगितले जात आहे की, पती-पत्नींमध्ये मतभेद होते. दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. त्यांनी कोर्टामध्ये घटस्फोटासाठी देखील धाव घेतली होती.


हेही वाचा – भिवंडीत महिलेची हत्या की आत्महत्या?

- Advertisement -

असे मिळाले हत्याचे पुरावे

पोलिसांनी २१ जानेवारीला तमिळ अभिनेत्री संध्याच्या मृतदेहाचे तुकडे जप्त केले होते. वेगवेगळ्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये ३५ वर्षआंच्या संध्यांच्या शरीराचे तुकडे फेकण्यात आले होते. संध्याच्या पायावर टॅट्यू होते. या टॅट्यूवरुन तो मृतेदह संध्याचा असल्याची ओळख पटली. पोलिसांनी सांगितले की, सर्वात आधी एका महिलेच्या मृतदेहाच्या हाताचा तुकडा सापडला होता त्यामध्ये बांगड्या होत्या. त्यानंतर एक पायाचा तुकडा सापडला त्यावर दोन टॅट्यू होते. दोन आठवड्यांच्या पोलीस तपासानंतर हा मृतदेह बालकृष्णन याची पत्नी अभिनेत्री संध्याचा असल्याचे समोर आले.


हेही वाचा – ‘ब्रेकअप के बाद’ अभिनेत्रीची आत्महत्या

- Advertisement -

हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकृष्णनने पत्नी संध्याची हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरिराचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे एक-एक तुकडे वेगवगळ्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. अशाप्रकारे बालकृष्णन याने मृतदेहाची विल्हेवाट लावली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु आहे. असे सांगितले जात आहे की, संध्याने तमिळ चित्रपटात जास्त काम केले नव्हते. ति थूथुकुडी येथे राहणारी होती. चित्रपट मिळवण्यासाठी तिचा संघर्ष सुरु होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -