घरताज्या घडामोडीAir India : एयर इंडियात आजपासून टाटा समुहाची सेवा, फ्लाईट्समध्ये मिळणार जेवणाची...

Air India : एयर इंडियात आजपासून टाटा समुहाची सेवा, फ्लाईट्समध्ये मिळणार जेवणाची सुविधा

Subscribe

केंद्र सरकारच्या वतीने एयर इंडियाची मालकी आज गुरूवारी टाटा समुहाकडे सोपावण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने टाटा समुहाकडून जवळपास ६९ वर्षे आधी कंपनीचा ताबा घेतला होता. आता पुन्हा एकदा एयर इंडियाचा मालकी हक्क केंद्र सरकारकडून टाटा समुहाला देण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज गुरूवारी एयर इंडियाचा ताबा टाटा समुहाकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याचाच भाग म्हणून टाटा समुहाकडून आजपासून एयरलाईन्समध्ये जेवणाच्या सुविधेला सुरूवात होणार आहे. (Tata groups talace private limited to introduce enhanced meal service in Air India flights )

केंद्र सरकारने निविदा प्रक्रिया राबवतानाच ८ ऑक्टोबर रोजी १८ हजार कोटी रूपयांना टाटा समुहाच्या टैलेस प्रायव्हेट लिमिटेड (talace private limited)ला एयर इंडियाचा मालकी हक्काची विक्री केली होती. ही कंपनी टाटा समुहाच्या होल्डिंग कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या व्यवहारातील सर्व औपचारिकता जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळेच एअर इंडियाचा मालकी हक्क गुरूवारी टाटा समुहाला सोपावण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मालकी हक्काचे हस्तांतरण एकीकडे होत असतानाच दुसरीकडे मात्र कामगार संघटनांनी न्यायालईन लढाईचा इशारा दिला आहे. इंडियन पायलट गिल्ड आणि इंडियन कर्मशिअल पायलट असोसिएशने एयर इंडियाचे अध्यक्ष विक्रम देव यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामागचे कारण हे पायलट म्हणून काम करणाऱ्या देण्यात येणाऱ्या पगारातील कपात हे सांगितले जात आहे. तर एयरपोर्टवर चालकांच्या संघटनेनेही वजनाच्या मुद्द्यावर एयर इंडियाने २० जानेवारीला काढलेल्या आदेशाला विरोध केला आहे. एयर इंडिया कर्मचारी संघ आणि इंडिया केबिन क्रू असोसिएशनने सोमवारी दत्त यांना पत्र लिहित या आदेशाचा विरोध करत अमानवीय असल्याचे सांगितले आहे. तसेच नियमाचे उल्लंघन असल्याचाही आरोप केला आहे.

चार फ्लाईट्समध्ये जेवणाची सुविधा

टाटा समूहाकडून आज एयर इंडियाच्या चार फ्लाईट्ससाठी जेवणाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगानेच टाटा समुहाचे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे. पण टाटा समुहाच्या बॅनरअंतर्गत या फ्लाईट्स नसतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई न्यूयॉर्क, मुंबई दिल्ली अशा पाच फ्लाईट्समध्ये ही सेवा देण्यात येईल. या सेवेचा विविध टप्प्याअंतर्गत विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

टाटा समुहातील तिसरा एयरलाइन ब्रॅण्ड

टाटा समुहाकडून कर्मचाऱ्यांना संपुर्ण टेकओव्हरबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी विकेंडला ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता आहे. करारान्वये टाटा समुहाला एयर इंडिया एक्सप्रेस आणि ग्राऊंड हॅण्डलिंगचा भाग असलेल्या एयर इंडिया एसटीएसची ५० टक्के हिस्सेदारीही सोपावण्यात येणार आहे. २००३-०४ नंतरचे केंद्र सरकारचे हे पहिलेच खासगीकरण असणार आहे. टाटा समुहाच्या अखत्यारीतील हा तिसरा एयरलाइन ब्रॅण्ड असेल. याआधी एयरएशिया इंडिया विस्तारा समुहात टटा समुहाची हिस्सेदारी आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -