घरदेश-विदेशवडिलांच्या औषधासाठी तो बनला दारुचा डिलीव्हरी बॉय!

वडिलांच्या औषधासाठी तो बनला दारुचा डिलीव्हरी बॉय!

Subscribe

बाल न्याय परिषदेत गुन्हा करणाऱ्या मुलाची परिस्थिती आणि त्याचे सत्य ऐकून न्यायाधीशांना वाटले वाईट

बिहारमधील बिहारशरीफ येथे आपल्या वडिलांचे औषध आणण्यासाठी किशोर महज हा मुलगा अवघ्या 200 रुपयांसाठी दारूचा डिलीव्हरी बॉय बनला. रविवारी तो दीपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणाहून 5 लिटर मद्याची चोरी करताना सापडला.

सोमवारी ही घटना बाल न्याय परिषदेत सादर करण्यात आली. या मुलाची परिस्थिती आणि त्याचे सत्य ऐकून न्यायाधीशांना अत्यंत वाईट वाटले. बाल न्याय परिषदेचे मुख्य दंडाधिकारी न्यायाधीश मानवेंद्र मिश्रा यांनी किशोरची परिस्थिती ऐकली आणि त्यांनी त्याचा जामीन मंजूर केला. याशिवाय त्याच्या कुटूंबाला अन्नधान्यांची उपलब्धताही करून देण्याचे आदेश त्यांनी पोलिस ठाण्याला दिले. एवढेच नाही तर किशोरला हा गुन्हा करायला भाग पाडणाऱ्यावर एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

वकील प्रमोद शरण सिंह यांनी सांगितले की, किशोरचे वडील एका महिन्यापूर्वी ताडच्या झाडावरून पडल्याने त्यांना दुखापत झाली होती, त्याच्यांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे त्याची आई कामावर कुठेही जाऊ शकत नसल्याने त्यांच्या वडिलांच्या औषधासाठी घरी पैसे नव्हते. दरम्यान किशोरने स्वत: न्यायाधीशांना संपूर्ण आपली सत्यपरिस्थिती सांगितली. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन प्रभारी धर्मेंद्र कुमार यांनी किशोरच्या घरी जाऊन जीवनावश्यक वस्तू दिल्या.

न्याय अधिनियम कायदा 78 नुसार अशा गुन्हेगाराला सात वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे, असे वकिलांनी सांगितले. तसेच न्यायाधीशांनी स्वतः याबाबत दखल घेत, अल्पवयीन मुलाला हा गुन्हा करणाऱ्यास भाग पाडणाऱ्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे कायदेशीर यंत्रणेवर आणि गुन्हेगारी विचारांच्या लोकांवर नक्कीच अंकुश राहिल.


मास्क न घातल्याने सीआरपीएफच्या जवानाला बेळगाव पोलिसांकडून मारहाण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -