घरदेश-विदेशजैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरच्या सुरक्षेत वाढ

जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरच्या सुरक्षेत वाढ

Subscribe

दोन्ही दहशतवादी संघटनेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एकमेकांना मदत करुन पुन्हा संघटना मजबूद करण्यावर चर्चा झाली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्ताची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरला सुरक्षित ठिकाणी लपवले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजहरला १७-१८ फेब्रुवारी म्हणजेच पुलवामा हल्ल्यानंतर रावलपिंडीवरुन बहावलपूरच्या जवळ कोटघानी येथे हलवण्यात आले. आयएसआयने मसूदच्या सुरक्षेत देखील वाढ केली आहे.

जैश आणि हिजबुल एकत्र

असे सांगितले जात आहे की, जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी अजहर रावलपिंडी येथील पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पुलवामा हल्ल्यानंतर त्याला तिथून हलवण्यात आले. १७-१८ फेब्रुवारीला रावलपिंडीवरुन त्याला कोटघानी येथे हलवण्यात आले. त्यानंतर अजहरने हिजबुल या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सरगना सैय्यद सलाउद्दीनची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर सुत्रांचे असे म्हणणे आहे की, दोन्ही दहशतवादी संघटनेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एकमेकांना मदत करुन पुन्हा संघटना मजबूद करण्यावर चर्चा झाली.

- Advertisement -

जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आहे अजहर

अजहर मसूद हा दहशतवादी संटना जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आहे. १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैशने स्विकारली होती. या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी केली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचे उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -