घरदेश-विदेशLive Update : काँग्रेसने चौथ्या यादीतून महाराष्ट्रातील दोन उमेदवारांची केली घोषणा

Live Update : काँग्रेसने चौथ्या यादीतून महाराष्ट्रातील दोन उमेदवारांची केली घोषणा

Subscribe

काँग्रेसने चौथ्या यादीतून महाराष्ट्रातील दोन उमेदवारांची केली घोषणा

धुळ्यातून शोभा बच्छाव आणि जालन्यातून कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर

- Advertisement -

10/4/2024 20:56:18


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाहनाला धडक देणारा ताब्यात

- Advertisement -

भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिसांची कारवाई

काल रात्री भंडाऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीला झाला होता अपघात

10/4/2024 20:10:52


नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

नागपुरात भाजपाचे उमदेवार नितीन गडकरी आणि शिवसेनेचे रामटेकचे उमदेवार राजू पारवे यांच्या समर्थनात पंतप्रधान मोदींची प्रचार सभा

10/4/2024 18:30:16


राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकारी डॉ. राजगोपाल देवरा यांची नियोजन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियुक्ती

आयएएस अधिकारी सौरभ विजय यांची वित्त विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

10/4/2024 17:55:36


भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची दहावी यादी जाहीर

उदयनराजे भोसले, पूनम महाजनांचे नाव भाजपाच्या दहाव्या यादीतही नाही

भाजपाच्या दहाव्या यादीतून किरण खेर, रिटा बहुगुणा जोशी यांचा पत्ता कट

10/4/2024 16:3:59


वर्षा गायकवाड मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला

थोड्यात वेळात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

10/4/2024 13:31:17


मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार- देवेंद्र फडणवीस

कांदीवलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पीयूष गोयल यांचा प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार असल्याचं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी एक कामही केलेलं नाही, असा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला.

10/4/2024 12:40:17


नोबेल पारितोषिक विजेते ‘गॉड पार्टिकल’ भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज, ज्यांच्या विश्वातील अज्ञात कणाच्या सिद्धांताने विज्ञान बदलले, त्यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. एडिनबर्ग विद्यापीठाने ही माहिती दिली. एडिनबर्ग विद्यापीठ, जिथे हिग्जने अनेक वर्षे प्राध्यापकी केली होती, त्यांनी सांगितले की आजारपणानंतर सोमवारी त्यांचे घरी निधन झाले.


मुनगंटीवारांविरोधात सचिन सावंत यांनी केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

भाजपाचे चंद्रपुर येथील उमेदवार सुधीर मुनगंटीवारांविरोधात केलेलया तक्रारीची दखल आता निवडणूक आयोगाने घेतली आहे.

मुनगंटीवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून हा वाद सुरू आहे.

10/4/2024 11:45:53


CM Delhi: केजरीवालांना झटका: वकिलाला आठवड्यातून पाच वेळा भेटण्याची मागणी कोर्टाने फेटाळली

तिहार तुरुंगात बंद अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून आणखी एक झटका बसला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या वकिलांना तिहार तुरुंगात आठवड्यातून पाच वेळा भेटण्याची परवानगी मागितली होती. मात्र, अशी मागणी करणारी मुख्यमंत्र्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. जेल मॅन्युअलनुसार, त्याला सध्या आठवड्यातून दोनदा वकिलांना भेटण्याची परवानगी आहे.

10/4/2024 11:2:18


पटोलेंना चिरडण्याचा डाव होता; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चिरडण्याचा डाव होता का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

10/4/2024 10:59:39


दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटक आणि रिमांडविरोधातील याचिका फेटाळली होती. अरविंद केजरीवाल यांनी षड्यंत्र रचल्याचे ईडी सामग्रीवरून दिसून येते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

10/4/2024 10:19:47


नाना पटोलेंच्या वाहनाला अपघात

अपघाताच्या वेळेस पटोले गाडीत नव्हते.

10/4/2024 9:27:26


शरद पवार गटाकडून साताऱ्यात शशिकांत शिंदेंना उमेदवारी

शरद पवार यांची तिसरी यादी जाहीर

साताऱ्यातून शिंदेंना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

10/4/2024 8:45:20


छत्तीसगडच्या दुर्गमध्ये मजुरांना घेऊन जाणारी बस दरीत पडली, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू

दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री 8 वाजता केडिया डिस्टिलरीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन कुम्हारीहून भिलीकडे निघालेली बस 50 फूट खोल खाणीत पडली. बसमध्ये 27 जण होते. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही शोक व्यक्त केला.

10/4/2024 7:50:4


पश्चिम रेल्वेच्या गाड्या 10-15 मिनिटं उशिराने

पश्चिम रेल्वेच्या गाड्या 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.

10/4/2024 7:43:4


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -