घरCORONA UPDATELockDown : यंदा हज यात्रा होण्याची शक्यता कमी; लोकांचे पैसे व्याजासह परत...

LockDown : यंदा हज यात्रा होण्याची शक्यता कमी; लोकांचे पैसे व्याजासह परत करा!

Subscribe

भारतातून जवळपास सव्वा लाख लोक हजला जात असतात. मात्र, यावर्षी हज यात्रा होण्याची शक्यता दिसत नाही.

केंद्र सरकारकडून हज यात्रेच्या प्रक्रियेला ऑक्टोबर महिन्यापासूनच सुरुवात होते. भारतातून जवळपास सव्वा लाख लोक हजला जात असतात. मात्र, यावर्षी हज यात्रा होण्याची शक्यता दिसत नाही. पण भारताच्या हज यात्रेकरूंना मात्र अजून यावर कुठलीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. हज यात्रा होणार की नाही हे स्पष्ट करून, यात्रा होणार नसल्यास लोकांनी यात्रेसाठी जमा केलेले पैसे परत करावे, असे पत्र महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दकी यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे.

हजचे पहिले विमान २० जूनला उड्डाण करणार होते

भारत सरकारने आंतराराष्ट्रीय उड्डाणांबाबतचा निर्णय ३० जूनपर्यंत घेणार असल्याचे ठरवले आहे. मात्र, हजचे पहिले विमान २० जूनला निघणार होते. तर दुसरीकडे सौदी अरेबियाने पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश सारख्या देशांना हजला लोक पाठवू नये, अशी सूचना आधीच दिल्याचे कळते आहे. पण भारताच्या हज यात्रेकरूंचे काय हा प्रश्न यात्रेसाठी पैसे भरलेल्यांच्या समोर निर्माण झाला आहे. कारण अजून भारत सरकारकडून काहीच स्पष्टता मिळाली नाही.

- Advertisement -

हज यात्रेसाठी लागणारा खर्च

– हज यात्रेचा प्रत्येकी खर्च २.५० लाख रुपये आहे.
– त्यातील प्रत्येकी आतापर्यंत जमा रुपये २ लाख रुपये.
– एकूण भारतातील यात्रेकरूंची संख्या १.२५ लाखांच्या आसपास.
– केंद्र सरकारकडे एकूण जमा रक्कम २४८० कोटी रुपये

पैसे व्याजासह परत करा

महाराष्ट्राचा हजचा कोटा १२ हजार यात्रेकरूंचा आहे. महाराष्ट्र हज समिती अध्यक्ष जमाल सिद्दकी यांनी अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पत्र लिहिले आहे. त्यात यात्रा होणार की नाही यावर स्पष्टता मागितली आहे. तसेच यात्रेकरूंचे पैसे जर यात्रा होणार नसेल तर लवकर काही व्याजासह परत करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -