Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश अयोध्येत रामनवमीचा उत्साह : शरयू काठावर रामभक्तांची गर्दी, एक क्विंटल पंचामृताने होणार अभिषेक!

अयोध्येत रामनवमीचा उत्साह : शरयू काठावर रामभक्तांची गर्दी, एक क्विंटल पंचामृताने होणार अभिषेक!

Subscribe

Ramnavami 2023 | मठ-मंदिरे, सार्वजनिक ठिकाणं, रस्ते रामभक्तांनी फुलून गेले होते. आज दुपारी रामजन्मोत्सवाचा उत्साह अयोध्येत पाहायला मिळणार आहे.

Ramnavami 2023 | अयोध्या – चैत्र शुक्ल नवमीला साजरा होणारा रामजन्मोत्सव दरवर्षी रामभक्तांसाठी श्रद्धेच्या विषय असतो. अयोध्येतील राममंदिरात तर लाखोंची गर्दी जमते. यावर्षीही अयोध्येत रामभक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. 22 मार्च रोजी वासंतिक नवरात्रीला सुरुवात झाल्यापासून रामजन्मोत्सवाचा जल्लोष दिसून आला, बुधवारी सायंकाळपर्यंत त्यात अनेक पटींनी वाढ झाली. मठ-मंदिरे, सार्वजनिक ठिकाणं, रस्ते रामभक्तांनी फुलून गेले होते. आज दुपारी रामजन्मोत्सवाचा उत्साह अयोध्येत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – रामनवमीला भाविक का जातात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला?

- Advertisement -

गर्दीची आणि अडचणींची पर्वा न करता भाविक रामनगरीकडे कूच करत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंदिरे, धर्मशाळांच्या खोल्या तुडुंब भरल्या आहेत. रामजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येपर्यंत मंदिर परिसर, उद्याने, स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही भाविकांनी तळ ठोकला. शरयू काठावर स्नानासाठी पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. दुपारपर्यंत शरयूस्नानाची प्रक्रिया थांबेल, त्यानंतर राम मंदिरामध्ये रामजन्मोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी रामनगरीत प्रचंड गर्दी होणार आहे.

रामजन्मभूमी, कनक भवन, हनुमानगढी या प्रमुख मंदिरांसह पवित्र शरयूला जोडणाऱ्या मार्गांवर बुधवारपासून भाविकांचा ओघ वाहत आहे. रामलल्लाला भेट देणाऱ्यांची संख्या, जी सामान्य दिवशी 10,000 च्या आसपास असायची ती मंगळवारपर्यंत 50,000 च्या वर पोहोचली. बुधवारी सायंकाळपर्यंत ही संख्या आणखी वाढली. गुरुवारी रामलल्लाला भेट देणाऱ्यांची संख्या केवळ एक लाखाचा टप्पा ओलांडणार नाही, तर एका दिवसात रामलल्लाला भेट देणाऱ्यांच्या संख्येचा विक्रमही निर्माण होमार असल्याचे सांगण्यात येते. जयंतीनिमित्त एक क्विंटल पंचामृताने अभिषेक करण्यात येणार आहे. अभिषेक झाल्यानंतर रामलल्लाला रामदल ट्रस्टचे अध्यक्ष पं. कल्किराम यांनी रत्नांनी जडलेला पिवळा पोशाख घातला जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – यंदा श्रीराम नवमी ३० मार्च २०२३ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने आला. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामजन्मभूमी येथे मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. राम मंदिर उभारणीच्या रूपाने अशक्य गोष्ट शक्य होत असल्याचे पाहून रामभक्तांचा आनंद अवर्णनीय वाटत होता, मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा आनंद व्यक्त करता आला नाही. गेल्या वर्षीपासून जेव्हा कोरोनाचे संकट थांबले, तेव्हापासून रामभक्तांचा ओघ अयोध्येत वाढत राहिला आहे.

भव्य राम मंदिर आणि दिव्य रामनगरीचे बांधकाम सुरू

गेल्या वर्षीचा दीपोत्सव, रामनगरीची 14 कोशी आणि पंचकोशी परिक्रमा आणि इंग्रजी नववर्षासह शिखराकडे वाढलेली श्रद्धा रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी सुवर्ण शिखराला स्पर्श करण्यास सज्ज दिसते. मात्र, श्रद्धेची उन्नती एवढ्यावरच थांबणार नाही. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रामानंद शुक्ला म्हणतात, सध्या भव्य राम मंदिर आणि दिव्य रामनगरीचे बांधकाम सुरू आहे. पुढील वर्षी नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करून रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Ram Navami 2022 : राम नवमीला बनतोय त्रिवेणी संयोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा

- Advertisment -