जगभरात देशाचा दबदबा वाढला; जी-७, जी-२०, एससीओ, युनोचं अध्यक्षपद भारताकडे

pm modi

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात जगभरात भारताचं महत्त्व वाढत आहे. जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांची कमान आता भारताकडे येणार आहे. तसंच, जगभरातील सर्वांत श्रीमंत देशांची असलेली जी-७ या संस्थेतही भारताचा समावेश होणार असून त्याचं नाव आता जी-८ होणार असल्याचं म्हटलं जातंय. भारताचा जगभरात वाढत असलेला दबदबा पाहता येत्या काळात भारत जगभरात महत्त्वाची भूमिका निभावू शकतं असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

भारताला मिळाली एससीओची कमान

शांघाय सहयोग संघटना म्हणजेच एससीओचे अध्यक्षपद भारताला मिळालं आहे. तर, पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या संघटनेचं संमेलन भारतात होणार आहे. रशिया, चीन, पाकिस्तान आणि मध्य आशियासह भारत या संमेलनात सहभागी होणार आहे. या संमेलनाचं अध्यक्ष होण्याच्या नात्याने भारत या संमेलनात दहशतवाद आणि विदेशी फंडिंगबाबत प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ६ इमारती, २१ प्लॉट, लाखोंचे सोने-दागिने; तहसीलदाराची कोट्यवधींशी संपत्ती जप्त

जी-२० चं अध्यक्षपदही भारताकडे

जगातील विकसित आणि विकसनशील देशातील प्रमुख संघटना असलेल्या जी-२० चं अध्यक्षपदही डिसेंबर महिन्यात भारताला मिळणार आहे. पुढच्याच वर्षी या संघनटेचं संमेलन भारतात होणार आहे. या संघटनांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, भारत, इंडोनेशिया, ब्रिटेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबियासारखी प्रभावशाली देश सहभागी आहेत.

संघटनेचं अध्यक्ष होण्याच्या नात्याने भारत या संमेलनात आपले मित्र देश मिस्त्र, बांग्लादेश, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, नेदरलॅण्ड, स्पेन, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमीराती आदी देशांना आमंत्रण पाठवणार आहे. यामुळे आशिया, युरोप, अफ्रिका खंडांमध्ये भारत आपला प्रभाव आणि विस्तार वाढवणार आहे.

हेही वाचा – देशभरातील पीएफआय नेत्यांविरोधात NIA, ED ची मोठी कारवाई; छापेमारी करत 100 कार्यकर्त्यांना अटक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपदही भारताला

तसंच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपदही यंदा भारताला मिळालं आहे. महिनाभर अध्यक्षपदाची कमान भारताकडे राहणार आहे. या काळात जगभरातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या परिषदेतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारताचे या परिषदेतील २ वर्षांचे अस्थायी सदस्यतेचा कार्यकाळही संपणार आहे.

गेल्या महिन्यात ब्रिटनला मागे टाकून भारत हा जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला. गेल्या महिन्यात जी-७ संघटनेचं संमेलन जर्मनीत झालं होतं. यावेळी जर्मनीने भारताला पाहुणे म्हणून आमंत्रण केलं होतं. त्यामुळे या संघटनेत आता भारतही सामिल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संघटनेचं नाव जी-८ होणार आहे. या संघटनेत आधी रशियाही समाविष्ट होता मात्र आता तो या संघटनेतून बाहेर पडला आहे.