घरदेश-विदेश'वंदे भारत मिशन'चा दुसरा टप्पा १७ मेपासून सुरू; मोहीम १८ दिवस चालणार

‘वंदे भारत मिशन’चा दुसरा टप्पा १७ मेपासून सुरू; मोहीम १८ दिवस चालणार

Subscribe

परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आण्यासाठी 'वंदे भारत मिशन' चालू करण्यात आलं आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा १७ मे पासून सुरु होत आहे.

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना आणण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ आणि ‘समुद्र सेतु’ ऑपरेशन चालू आहे. आता केंद्र सरकारने भारतीयांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आणण्याच्या दुसर्‍या टप्प्याची घोषणा केली आहे. दुसरा टप्पा १७ मे ते ३ जून म्हणजे १८ दिवस चालणार आहे. एअर इंडियाच्या ‘वंदे भारत मिशन’ च्या दुसर्‍या टप्प्यातील विशेष विमानासाठी बुकिंगही गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालं आहे. या टप्प्यात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरसह ३१ देशांमध्ये अडकलेल्या लोकांना घरी परत आणलं जाणार आहे.

भारतीयांना घरी आणण्याच्या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात, ३१ देशांमध्ये १४९ आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधून अडकलेल्या ३०,००० भारतीयांना घरी परत आणलं जाणार आहे. यातील बहुतेक उड्डाणे एअर इंडिया आणि काही एअर इंडिया एक्स्प्रेसद्वारे चालवली जातील. १७ मेपासून ही मोहीम सुरू होणार आहे. जेव्हा एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे १९ मे पासून सुरु होतील ती ३ जूनपर्यंत चालतील.

- Advertisement -

वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात १५ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात आलं. तथापि, आता ही संख्या दुप्पट होईल आणि त्यात अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, युएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, कुवैत, बहरेन, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, युक्रेन, रशिया, जॉर्जिया, कझाकस्तान, ख्रिश्चन, ताजिकिस्तान, आर्मेनिया, फ्रान्स, इटली, जर्मनी, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, जपान, थायलंड, नेपाळ, बेलारूस, नायजेरिया आणि बांगलादेश या देशांचा यात समावेश आहे.


हेही वाचा – कामगार कायद्यात बदल केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

- Advertisement -

मागील मोहिमेचा एक भाग म्हणून, फक्त १० राज्यात उड्डाण करण्यात आलं होतं. तर यावेळी संख्या जास्त आहे आणि त्यात दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, जम्मू-काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि चंदीगडचा समावेश आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -