घरमहाराष्ट्रखारघरमधील मृत्यूप्रकरणी विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवा; पटोलेंची मागणी

खारघरमधील मृत्यूप्रकरणी विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवा; पटोलेंची मागणी

Subscribe

खारघरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात उष्माघातामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी दोन दिवसाचे विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांकडे पत्राच्याद्वारे केली आहे.

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. पण आता या प्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे. दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या मागणीचे पत्र पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना लिहिले आहे.

खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (ता. 16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला. पण यावेळी श्री सदस्यांना उन्हात बसविण्यात आल्याने एकूण 14 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. पण आता या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे या संदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. याबाबतचे ट्वीट देखील त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, खारघरमध्ये घडलेली घटना ही सरकारने घडवून आणलेली घटना आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेत हा कार्यक्रम घेण्यात आला, असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण यांसारखा वात्रटपणा करत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच सरकारकडून आरोप करण्यात येत असल्याने हे काही बरोबर नाही, असेही नाना पटोले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

स्वतःसाठी एअर कंडिशन व्यासपीठ पण जी जनता राजा आहे, त्या जनतेला उन्हात बसवून मृत्यूच्या दाढेत टाकण्याचे काम पाप सरकारने केले आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे या संपूर्ण घटनेची जबाबदारी ही सरकारची आहे, असेही यावेळी नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी विशेष दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी नाना पटोले यांनी केल्यानंतर त्यांनी याबद्दलचे ट्वीट देखील केले आहे. “खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. सदोष मनुष्यवधाच्या या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून केली आहे.” असे ट्वीट त्यांनी केले आहे.


हेही वाचा – Bhosari Land Misappropriation : खडसेंच्या जावयाला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -