Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Third Wave in India: CIIने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी दिला सल्ला; देशाला...

Third Wave in India: CIIने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी दिला सल्ला; देशाला कसे अनलॉक करायचे? वाचा

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. त्यानंतर आता कोरोना दुसरी लाट एकाबाजूला मंदावत असून दुसऱ्या बाजूला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्योग मंडल CIIचे अध्यक्ष टीवी नरेंद्रन यांनी सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी सर्व निर्बंध शिथिल करताना (अनलॉक) सतर्क दृष्टिकोन पाळला पाहिजे, असे सांगितले आहे. तसेच ते म्हणाले की, तातडीने लॉकडाऊन खोलताना साखळी पुन्हा सुरू करण्यासह आर्थिक कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विकास पुनरुज्जीवन आणि बहुसंख्य कामगारांचे जीवनमान सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.

पीटीआयशी बातचित करताना CIIचे अध्यक्ष नरेंद्रन म्हणाले की, सर्वकाही उघडण्याऐवजी आपण कोणत्या गोष्टींना परवानगी दिली आहे? आणि कोणत्या गोष्टींना नाही? याला प्राधान्य दिले पाहिजे. यादरम्यान अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या उघडल्या पाहिजेत किंवा त्याच्यात निर्बंधात सूट देण्याची गरज नाही. आर्थिक गोष्टीला चालना देण्याऱ्या बऱ्याच गोष्टी उघडल्या पाहिजेत. परंतु सामाजिक गोष्टी काही महिने बंद करू शकता, त्यांना काही महिने बंद करा. उगाच अतिरिक्त धोका का वाढवायचा?

- Advertisement -

देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्येत घट झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याची घोषणा केली आहे. याबाबत सीआयआयचे अध्यक्ष म्हणाले की, मे आणि एप्रिलमहिन्यात आर्थिक घसरण झाली आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. आतापासून ते डिसेंबर २०२१पर्यंत वयोवृद्ध लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी रोज कमीत कमी ७१.२ लाख लसीकरण करायला पाहिजे.


हेही वाचा – नागरिकांनो तुमची काळजी घ्या! राज्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण


- Advertisement -

 

- Advertisement -