घरताज्या घडामोडीCorona Third Wave: कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यात शिगेला पोहोचणार; देशातील वैज्ञानिकांचा...

Corona Third Wave: कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात शिगेला पोहोचणार; देशातील वैज्ञानिकांचा अंदाज

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू मंदावत आहे, पण यादरम्यानच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील काही वैज्ञानिकांनी कोरोना तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शिगेला पोहोचणार असा अंदाज वर्तवला आहे. देशातील कोरोनाबाधित प्रकरणावर नजर ठेवणाऱ्या सरकारी पॅनलच्या वैज्ञानिकांच्या मते, जर कोरोना संबंधित सावधगिरी बाळगली नाही तर कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान शिगेला पोहोचेल. दरम्यान यासोबत त्यांनी एक दिलासादायक बाब सांगितले की, यादरम्यान दुसरा लाटेमधील नव्या कोरोनाबाधितांची संख्येच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे अर्धी असतील.

तिसऱ्या लाटेत दैनंदिन इतक्या कोरोनाबाधितांची नोंद होईल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मार्च, एप्रिल, मे यादरम्यान थैमान घातले. आता जरी कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेचे सावट आले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट शिगेला पोहोचणार. यादरम्यान १ लाख ५० हजारपासून ते २ लाख इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते. शिवाय वैज्ञानिकांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परंतु यावेळी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोक्याचा उल्लेख केला आहे. जर तिसऱ्या लाटेच्या वेळी कोरोनाच्या नवा व्हेरियंट समोर आला तर तिसरी लाटेचा वेगाने फैलाव होईल.

- Advertisement -

आयआयटी कानपूरचे प्रो.मणींद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या सुत्राने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीचा अभ्यास केला. त्यांच्यामते, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना प्रकरणे वाढण्याची शक्यता जास्त आहे. नोव्हेंबरपासून लाटेचा वेग जास्त होऊ शकतो. तर १५ नोव्हेंबरला संक्रमणाचा आलेख घसरू लागले. तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक नसेल. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे गरजेचे आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातील देशात दररोज १.८० लाख प्रकरणाची नोंद होईल.


हेही वाचा – Neeri’s gargling कोरोना टेस्ट किटला DCGI ची मंजुरी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -