घरदेश-विदेशअहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Subscribe

गुजरातमधील अहमदाबादच्या अमरायवाडी येथे कोसळलेल्या इमारतीमध्ये सायंकाळपर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही इमारत कोसळल्यानंतर या परिसरात एकच हाहाकार उडाला होता. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य अद्यापही सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यती अजूनही वर्तवली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे सीलमपूर परिसरात चार मजली इमारत कोसळली होती. त्यात दोन जण ठार झाले होते आणि तीन लोक जखमी झाले होते.

- Advertisement -

गुजरातमधील अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली ८ ते १० लोकं अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -