घरताज्या घडामोडीराजस्थानात कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

राजस्थानात कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

Subscribe

राजस्थानमधील कोटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करण्यास सुरूवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये राहणाऱ्या अंकुश आणि उज्ज्वल या दोन मुलांनी आत्महत्या केली. तसेच हे दोघेही वेगवेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होते आणि एकाच पीजी हॉस्टेलमध्ये राहत होते. दोन्ही मुले एकाच खोलीत राहत होते. दोघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर तिसरा विद्यार्थी हा मध्य प्रदेशातील आहे. प्रणव वर्मा असं त्याचं नाव आहे. प्रणव हा मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी होता.

- Advertisement -

एक अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाची तयारी करत होता, तर दुसरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होता आणि तिसरा विद्यार्थी नीटच्या परिक्षेची तयारी करत होता. या तिन्ही विद्यार्थ्यांकडून अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाहीये.

कोटा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

2019 मध्ये, राजस्थान सरकारकडून अशा इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता. कोचिंग इन्स्टिट्यूट केंद्राच्या नियमासाठी एक राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली होती. परंतु त्यावर अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. 2016 मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याआधी कोचिंग इन्स्टिट्यूट बंद करण्यात यावे, असं म्हटलं होतं. मात्र, अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा दखल न घेतल्यामुळे राजस्थानात अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत.


हेही वाचा :यंदाच्या वर्षात देशभरात 3 हजार किलोपेक्षा अधिक सोने जप्त, केरळात सर्वाधिक तस्करी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -