Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तिहार तुरुंगात गँगवॉर... गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; प्रशासनात खळबळ

तिहार तुरुंगात गँगवॉर… गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; प्रशासनात खळबळ

Subscribe

दिल्लीच्या तिहार तुरुंगातून एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. तिहार तुरुंगात गँगवार झालं असून गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याची हत्या करण्यात आली आहे. टिल्लूच्या हत्येनंतर संपूर्ण प्रशासनात एक खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी तिहार तुरुंगात हल्ला करून त्याची हत्या केली. गंभीर अवस्थेत त्याला दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

पश्चिम विभागाचे अतिरिक्त डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी ७ वाजता तिहार तुरुंगात घडली. डीडीयू रुग्णालयात आणलेल्या दोन अंडरट्रायल कैद्यांपैकी एक सुनील उर्फ टिल्लू हा बेशुद्धावस्थेत होता. डॉक्टरांनी त्याला तपासले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. तर दूसरा जखमी कैदी रोहितवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

कोण होता टिल्लू ताजपुरिया?

गँगस्टर टिल्लू ताजपुरिया हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. तो श्रद्धानंद कॉलेजमधून उत्तीर्ण झाला होता. जितेंद्र गोगी यांच्याशी त्यांची मैत्री कॉलेजच्या काळात प्रसिद्ध होती. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत दोघांनीही थेट निवडणूक लढवली नाही, परंतू दोघेही आपले स्वतंत्र पॅनल स्थापन करून उमेदवार उभे करायचे.


हेही वाचा :JET Airways पाठोपाठ आता ‘ही’ कंपनी होणार दिवाळखोर; 3 दिवसांसाठी सर्व बुकिंग रद्द, जाणून घ्या


 

- Advertisment -