Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश JET Airways पाठोपाठ आता 'ही' कंपनी होणार दिवाळखोर; 3 दिवसांसाठी सर्व बुकिंग...

JET Airways पाठोपाठ आता ‘ही’ कंपनी होणार दिवाळखोर; 3 दिवसांसाठी सर्व बुकिंग रद्द, जाणून घ्या सविस्तर

Subscribe

गो फर्स्ट एअरलाइन लवकरच दिवाळखोरीत निघू शकते, अशीही माहिती मिळाली आहे. कंपनीने यासाठी एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. गो फर्स्टच्या साइटवर ही माहिती  उपलब्ध आहे.

GoFirst Airways Booking:विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसांत प्रवास करायचा असेल, तर जाणून घ्या की GoFirst एअरलाइनने पुढील तीन दिवस बुकिंग बंद केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, GoFirst एअरलाइनच्या 60 टक्क्यांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही उड्डाणे रद्द असल्याने अनेक मार्गांवर एअरलाईन बुकिंग होत नाहीये. दरम्यान, गो फर्स्ट एअरलाइन लवकरच दिवाळखोरीत निघू शकते, अशीही माहिती मिळाली आहे. कंपनीने यासाठी एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. गो फर्स्टच्या साइटवर ही माहिती  उपलब्ध आहे. ( Go First Airline Files Voluntary insolvency Suspending Flights on 3 And 4 May )

उड्डाणे का रद्द होत आहेत?

एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएला दिलेल्या माहितीत GoFirst ने सांगितले की, 4 मे पर्यंत फ्लाइटचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले आहेत. इंजिन आणि कॅश फ्लोच्या कमतरतेमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान कंपनीने तत्काळ इंजिन उपलब्ध होण्यासाठी अर्ज केला आहे.

GoFirst दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

- Advertisement -

गो फर्स्ट एअरलाईनने दावा केला आहे की जर विमानाचे इंजिन निर्माता प्रॅट अँड व्हिटनीने त्वरित पुरवले नाही तर कंपनी दिवाळखोर होईल. गो एअरने अमेरिकेच्या डेलावेअर कोर्टात प्रॅट अँड व्हिटनी विरुद्ध आपत्कालीन अर्जही दाखल केला आहे. गो फर्स्टचे सीईओ कौशिक खोना म्हणाले की गो फर्स्टने एनसीएलटीकडे दिवाळखोरी प्रक्रियेसाठी स्वेच्छेने अर्ज केला आहे.

विमान कंपनीत 5000 पेक्षा जास्त कर्मचारी

3 आणि 4 मे रोजी Go First एअरलाइन्सची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे खोना यांनी सांगितले. त्यानंतर विमानसेवा पुन्हा सुरू होईल. GoFirst मध्ये 5,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: भारत-चीनचे या क्षेत्रात राहणार मोठे योगदान; आंतरराष्ट्रीय अहवालाने दिले संकेत )

2022 मध्ये कंपनीचे किती नुकसान झाले?

गो फर्स्टने जुलै 2022 मध्ये प्रथमच आपली विमाने रद्द केली होती आणि तेव्हापासून कंपनीचे शेअर्स बाजारात सातत्याने घसरत आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीचा बाजार हिस्सा 11.1 टक्के होता. त्यानंतर 12.7 लाख प्रवाशांनी GoFirst विमानांमध्ये उड्डाण केले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 21.8 दशलक्ष डॉलर्सचा तोटा झाला.

- Advertisment -