ईडीच्या टायपिंग मिस्टेकमुळे ममता बॅनर्जींच्या नातेवाईकाला मनस्ताप

tmc ed relative of mamta banerjee maneka gambhir reached ed office at midnight office was locked

महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी सक्रिय झाले आहे. विविध प्रकरणात ईडीकडून तृणमूल नेत्यांच्या संपत्तीवर छापेमारी सुरु आहे. तसेच चौकशीचे सत्र सुरु आहे. पण यात ईडीच्या एका चुकीमुळे तृणमूल खासदाराला मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका टायपिंग मिस्टेकमुळे ईडीवर आता टीकेची झोड उठवली जात आहे. ईडीने ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची मेव्हूणी मेनका गंभीर यांना एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली होती. यामुळे मेनका गंभीर नोटीसीतील वेळेप्रमाणे मध्यरात्री चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या. मात्र कार्यालयाला बाहेरून कुलूप होते.

नेमकं काय घडलं?

ईडीला मेनका गंभीर यांना एका प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी दुपारी 12 वाजता बोलवायचे होते. पण ईडीने चौकशीच्या नोटीसमध्ये चुकून रविवारी मध्यरात्री 12 ची वेळ लिहिली. यामुळे ईडीने नमुद केलेल्या वेळेनुसार मेनका रविवारी मध्यरात्री 12 च्या वेळेस सॉल्ट लेक परिसरातील सीजीओ कॉम्प्लेक्समधील ईडी कार्यालय पोहोचल्या. मात्र तिथे गेल्यावर ईडी कार्यालयाला टाळे होते. यावेळी मेनका गांधी टाळे लागलेला फोटो काढून तेथून निघाल्या. या घटनेवर मेनका गंभीर म्हणाल्या की, ईडीच्या नोटीसाला उत्तर देण्याची मी तयार होते, म्हणून दिलेल्या वेळेत मी ईडी कार्यालयात पोहोचले. मात्र या घटनेवर ईडीने स्पष्टीकरण दिले की, घडलेला प्रकार हा टायपिंग करणाऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे घडला आहे.


यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मेनका गंभीर म्हणाल्या की, मला रात्री 12.30 वाजता ईडी कार्यालयात बोलवण्यात आले, त्यामुळे मी तिथे गेले, यावेळी मेनका त्यांच्या वकिलांसह ईडी कार्यालयात पोहचल्या. मेनका गंभीर यांना 10 सप्टेंबर रोजी ईडी अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री 12.30 वाजता चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची गरज असल्याचे काण देत ईडीने मेनका यांना परदेशात जाण्यापासून रोखले.

दरम्यान या घटनेनंतर आता मेनका यांना दुपारी 2 वाजता ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ईडी या प्रकरणात गंभीर असून चौकशी अद्याप बाकी आहे. सीबीआयने यापूर्वी मेनका गंभीर यांची चौकशी केली, कोलकत्ता उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये ईडीला दिल्लीऐवजी कोलकत्ता स्थानिक ईडी कार्यालयात मेनका गंभीर यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


… नाही तर चालणं, बोलणं, फिरणं कठीण होईल; प्रभादेवी राडा प्रकरणावरून नारायण राणेंचा शिवसेनेला थेट इशारा