घरदेश-विदेशबनारसी साड्यांवर तिरंगा, चायना बॉयकॉटचा संदेश

बनारसी साड्यांवर तिरंगा, चायना बॉयकॉटचा संदेश

Subscribe

भारत-चीन सीमेवरील तणावानंतर भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली. चीनी Apps, कंपन्यांवर केंद्राने बंदी घातली. दरम्यान, आता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाजारात साड्या आल्या आहेत. या साड्यांवर तिरंगा छापण्यात आला असून चायना बॉयकॉटचा संदेश देखील देण्यात आला आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या रेशीम धाग्यांनी बनवलेल्या बनारसी साड्यांवर चायना बॉयकॉटचा संदेश छापण्यात आला आहे. या साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महिला विशेष तयारी करत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा असलेल्या बनारसी साड्या बाजारात आल्या आहेत. भारताचा नकाशाच नाही तर त्यावर जय हिंद-जय भारत देखील लिहिलेल्या साड्या आल्या आहेत. बॉयकॉट चायना लिहिलेल्या साड्या देखील बाजारात आल्या आहेत.

- Advertisement -

साडी विक्रेत्यांनी सांगितलं की, या साड्यांचा हेतू केवळ राष्ट्रभक्ती दाखवणं एवढंच आहे. हातमागच्या जवळपास एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर विणकरांनी या साड्या तयार केल्या आहेत. या साड्यांची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे. या साड्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग पीएम केअर्स फंड किंवा कोरोना वॉरियर्सला देण्यात येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -