घरदेश-विदेशट्विटरकडून ANI हॅंडल ब्लॉक; under age चा ठेवला ठपका

ट्विटरकडून ANI हॅंडल ब्लॉक; under age चा ठेवला ठपका

Subscribe

नवी दिल्लीः ट्विटरने ANI चे हॅंडल ब्लॉक केले आहे. under 13 years of age चा ठपका ठेवत bad news म्हणून ट्विटरने ही कारवाई केली. ANI चे ७.६ मिलिनियन फोलोअर्स आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्विटरने चुकीची माहिती पसरवणारी तब्बल १६ लाख खाती बंद केली.

ANI च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या खासगी अकाऊंटवरुन हे ट्वीट केले.   ANI चे खाते पुन्हा सुरु होत नाही तोपर्यंत एएनआय डिजिटल आणि एहिंदीन्यूज या ट्विटर हॅंडलवर बातम्या बघता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एनडीटीव्हीचेही ट्विटर हॅंडल बंद करण्यात आले आहे. ही खाती पुन्हा सुरु होण्यासाठी २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. अकाऊंट बंद करण्याआधी ANI ची गोल्ड टीक हटवून ब्ल्यू टीक करण्यात आली होती. त्यांनतर ट्विटरने ANI चे अकाऊंटच बंद केले, अशी माहिती संपादक स्मिता प्रकाश यांंनी दिली.

- Advertisement -

 

ट्विटरच्या या कारवाईमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र काही जणांची खाती पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ एप्रिलला अशाच प्रकारे काही खाती ट्विटरने बंद केली. अनेकदा ट्विटरवर आक्षेपार्ह आणि सामाजिक वातावरण खराब होईल, अशा प्रकारचे पोस्ट काही लोकांकडून करण्यात येतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ट्विटरकडून एक-दोन लाख नाही तर तब्बल 16 लाखांपेक्षा अधिक ट्विटर खाती बंद करण्यात आलेली आहेत. याबाबतची माहिती ट्विटरच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

आपल्या ट्विटरच्या खात्यांचा गैरवापर करणे, हॅक केलेली माहिती किंवा कॉपी केलेली माहिती, अश्लील फोटो, हिंसा पसरवणारी माहिती, वैयक्तिक अशी माहिती ज्यामुळे समाजातील लोकांमध्ये त्याबाबतची चुकीची माहिती पोहोचली जाईल अशा खाते धारकांची खाती ट्विटरकडून बंद करण्यात आलेली आहेत. याआधी सुद्धा ट्विटरने अनेकांची खाती बंद केलेली आहेत. जानेवारी ते जून 2022 या कालावधीत ट्विटरकडे 65 लाख आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आलेली होती. ज्यामुळे याकडे गांभीर्याने पाहात ट्विटरने तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक ट्विटर अकाउंटवर कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -