घरदेश-विदेशआसाम दुर्घटनेत राष्ट्रीय फुटबॉलपटूसह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

आसाम दुर्घटनेत राष्ट्रीय फुटबॉलपटूसह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रात ऑईल इंडियाच्या बागजान तेलाच्या विहिरीत गेल्या १५ दिवसांपासून लागलेल्या गॅस लिकेज होत होती. त्यानंतर याचे आगीत रुपांतर झाले. या आगीत अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या जंगलाचा एक भाग, घरे आणि वाहन या आगीत जळून खाक झाली. या घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी ऑईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला.

ऑईल इंडियाचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी मंगळवारी बेपत्ता झाले होते. एनडीआरएफच्या जवानांना बुधवारी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. त्यांचा मृतदेह आगलेल्या ठिकाणी पाणी असलेल्या परिसरात आढळला. त्यांच्या शरिरावर आगीचे कोणतेही व्रण नसल्याने पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. पंरतू त्यांच्या मृत्येचे ठोस कारण हे शवविच्छदन अहवालानंतरच समोर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही कर्मचाऱ्यांची ओळख पटली असून दुरलोव गोगोई आणि टीकेश्वर गोहेन असे त्यांचे नाव आहे. हे दोघेही अग्निशमन दलात सहायक ऑपरेटरपदी कार्यरत होते. गोगोई हे राष्ट्रीय फुटबॉलपटू होते. त्यांनी अंडर १९ आणि अंडर २१ संघात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आसामचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते ऑईल इंडिया कंपनीच्या फुटबॉल टीमचे गोलकिपर होते.

हेही वाचा –

नियतीचा खेळ! कुत्र्याला वाचवायला गेला आणि पत्नीसह मुलांना गमावून बसला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -