घर देश-विदेश भारत सरकारने खडसावल्यावर आली ब्रिटनला जाग; उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा केला निषेध

भारत सरकारने खडसावल्यावर आली ब्रिटनला जाग; उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा केला निषेध

Subscribe

लंडनमधील भारतीय उच्चायोगावर तिरंग्याचा अपमान आणि झालेल्या तोडफोड केल्याप्रकरणी ब्रिटनमधील अधिका-यांनी निंदा केली आहे.

नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंग्याचा अपमान आणि झालेल्या तोडफोडप्रकरणी ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. भारत सरकारने या घटनेबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले, त्यानंतर ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना जाग आली. भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेला गंभीरतेने घेतले जाईल. तसेच, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

भारतात खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या विरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे खालिस्तानी समर्थक जोरदार विरोध प्रदर्शन करत आहेत. लंडनमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनातही खालिस्तानी समर्थकांचा सहभाग होता. लंडनस्थित भारतीय उच्चायुक्तालयावर या खालिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. तसेच, तिरंगा उतरवून खालिस्तानी झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उच्चायुक्तालयातील एका भारतीय अधिकाऱ्याने त्यांना रोखले. त्यावेळी खालिस्तानी समर्थकांनी तोडफोड केल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेत ब्रिटिश पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

- Advertisement -

या घटनेनंतर ब्रिटनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याची दखल ब्रिटन सरकारकडून गंभीरतेने घेईल. उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, तसेच तिरंग्याचा झालेला अपमान ही बाब गंभीर आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान, दोन सुरक्षा कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात येत आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी ट्वीट करत, या घटनेचा निषेध केला आहे.

( हेही वाचा: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा तिसरा टीझर लॉन्च, बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ क्लिप पाहून लोक भावूक )

- Advertisement -

भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त एलेक्स एलिस यांनीदेखील या घटनेला ‘अपमानजनक’ म्हटले आहे. विम्बल्डनमधील परराष्ट्र कार्यालयमंत्री लाॅर्ड तारिक अहमद यांनी सांगितले की, या घटनेने मी अस्वस्थ आहे. भारतीय उच्चायुक्ताच्या सुरक्षेला आम्ही गंभीरतेने घेऊ. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ही घटना म्हणजे उच्चायुक्तालय आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या अखंडतेबाबत अस्वीकारार्ह बाब आहे.

हल्ला झाला तेव्हा सुरक्षा रक्षक अनुपस्थित 

भारतीय परारष्ट्र मंत्रालयाने लंडनमध्ये झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय उच्चायुक्तालयावर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा सुरक्षारक्षक अनुपस्थित होते. आता या घटनेनंतर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. भारतीय सरकारने सांगितले की, हे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे देखील उल्लंघन आहे. सरकारने ब्रिटिश उच्चायुक्तांकडे या घटनेच्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा: भास्कर जाधव म्हणतात, रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर! )

भारतीय उच्चायुक्तालयाचे खालिस्तानी समर्थकांना जशास तसे उत्तर 

भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने खालिस्तानी समर्थकांना जशास तसे उत्तर दिले आहे. भारत सरकारने उच्चायोगावर आता एक विशाल तिरंगा फडकवला आहे. खालिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये असलेल्या भारतीय उच्चायोगावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच घटनेनंतर आता भारत सरकारने खालिस्तानी समर्थकांना जशास तसे उत्तर दिले आहे.

- Advertisment -