घरताज्या घडामोडीUkraine crisis : युक्रेनमधील भारतीयांनी तात्काळ कीव शहर सोडावे, भारतीय दूतावासाकडून नवीन...

Ukraine crisis : युक्रेनमधील भारतीयांनी तात्काळ कीव शहर सोडावे, भारतीय दूतावासाकडून नवीन ॲडवायझरी जारी

Subscribe

भारताकडून युक्रेनमधील आणि युक्रेनची(Ukraine) राजधानी असलेल्या कीवमधून तात्काळ निघावे असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. युक्रेनच्या भारतीय दुतावासाकडून नवीन अॅडवायझरी (Latest Advisory) जारी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांसह, भारतीय लोकांना युक्रेनची राजधानी कीव सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजच्या आजच कीव सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कीव सोडण्यासाठी मिळेल त्या वाहनाचा वापर करण्यासही सांगितले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिकच तीव्र होताना दिसत आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात सैन्य युक्रेनच्या दिशेने रवाना झाले आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे.

भारतीय दूतावासाने सोमवारीच युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमधील भारतीयांना रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना होण्याचे आदेश दिले होते. रेल्वे स्टेशन सल्लागाराने सांगितले की, लोकांना पश्चिम क्षेत्राकडे नेण्यासाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सेवा पुरवण्यात येत आहे. तसेच ईमानदारीने सर्व भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आणि एकजुट राहण्याची विनंती करतो आहोत. रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे सगळ्यांनी धीर धरावा आणि विश्वास ठेवावा तसेच आक्रमक होऊ नये असे युक्रेनच्या रेल्वेकडून सांगण्यात आले होते.

- Advertisement -

सर्व विद्यार्थ्यांना आपला पासपोर्ट, रोख पैसे आणि कपडे सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान ऑपरेशन गंगाअंतर्गत भारतात आणण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना हंगरी, पोलंड, रोमानिया आणि चेक गणराज्य तसेच युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या देशांमध्ये पाठवण्यात येत आहे.

- Advertisement -

भारत सरकाने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना भारतात आणण्यासाठी वेगवेगळे सोशल मीडिया हँडल तयार केले आहेत. युक्रेन तसेच युक्रेनसीमेलगत असलेल्या देशात बचाव करण्यासाठी नंबर आणि माहिती प्रसारित केली आहे. भारताचे युक्रेनमध्ये जवळपास २० हजार नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. आतापर्यंत ४ हजार लोकांना भारतामध्ये सुखरुप आणण्यात यश आलं आहे. मंगळवारी १८२ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन सातवे विमान भारतात परतले आहे.


हेही वाचा : Russia Ukraine War : चीनची कीववर करडी नजर भारतासाठी धोक्याचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -