घरताज्या घडामोडीUkraine Russia War: भारतीय नागरिकांनो तात्काळ खारकिव सोडा, भारतीय दूतावासाची दुसरी ॲडव्हायजरी...

Ukraine Russia War: भारतीय नागरिकांनो तात्काळ खारकिव सोडा, भारतीय दूतावासाची दुसरी ॲडव्हायजरी जारी

Subscribe

युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खारकिवची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. रशियन सैन्य सतत खारकिववर हल्ला करत आहे. यादरम्यान युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने एका तासांत दुसरी ॲडव्हायजरी जारी केली आहे आणि तात्काळ खारकिव सोडण्याचा सल्ला भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिला आहे. ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, ‘ज्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना गाडी, बस मिळत नाही आणि रेल्वे स्टेशनवर आहेत, त्यांनी चालत पेसोचिन, बाबाये, बेझलीयुदोव्का पोहोचा. खारकिवपासून पेसोचिन ११ किलोमीटर दूर आहे. बाबायो १२ किलोमीटर आणि बेझलीयुदोव्का १६ किलोमीटर दूर आहे.’

भारतीय दूतावासाने ट्वीट केले आहे की, ‘कोणत्याही परिस्थितीत या स्थानकांवर आज युक्रेनच्या वेळेनुसार सहा वाजेपर्यंत (1800) पोहोचा.’ यापूर्वी दूतावासाने म्हटले होते की, ‘खारकिवमधील भारतीय नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षा लक्षात घेऊन तात्काळ बाहेर पडून पेसोचिन, बाबाये आणि बेझलीयुदोव्का येथे लवकरात लवकर पोहोचणे महत्त्वाचे आहे.’

- Advertisement -

दरम्यान जेव्हा युक्रेनमधील स्थिती गंभीर होत आहे, तेव्हा भारतीय दूतावास ॲडव्हायजरी जारी करून भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अलर्ट करत आहेत. सध्या रशिया खारकिववर जोरदार हल्ला करत आहे. खारकिवमधील स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुप्तचर मुख्यालयावर रशियाने हल्ला केला असून याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान ही गंभीर परिस्थिती पाहता खारकिवमधील लोकांना सबवे टनलमधून चालत प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेश परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम वेगाने सुरू केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Russia-Ukraine War: युक्रेनमधून MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -