घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनमधून MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

Russia-Ukraine War: युक्रेनमधून MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

Subscribe

कोणतेही युद्ध नेहमी आपल्यासोबत हजारो समस्या घेऊन येते. युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती खूप चिघळली आहे. अशा परिस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जात आहे. काल, मंगळवारी रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा खारकिवमध्ये मृत्यू झाला. ज्यानंतर भारताने रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू केले आहे. माहितीनुसार, जवळपास १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षक होते.

युक्रेनमधील विद्यार्थी भारतात पूर्ण करू शकतात हा कोर्स?

फॉरेन मेडिकल ग्रेज्युएट (FMG)साठी नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे (NMC) जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार, एमबीबीएस कोर्सच्यामध्ये कोणत्याही परदेशातील युनिव्हर्सिटीमधून भारतीय युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर करण्याची परवानगी नाही. कारण दोन्ही युनिव्हर्सिटीच्या अॅडमिशनसाठी गाईडलाईन्स आणि निवड निकष वेगवेगळे आहेत. FMG विद्यार्थी फक्त आपला कोर्स पूर्ण झाल्यानंतर आणि इंटर्नशिप संपल्यानंतर प्रॅक्टिससाठी भारतात परतू शकतात.

- Advertisement -

गाईडलाईन्सनुसार, आपला कोर्स पूर्ण केल्यानंतर FMG विद्यार्थ्यांना आपल्या मेडिकल संस्थेतून १२ महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. त्यानंतर भारतात परतून पुन्हा १२ महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते. युक्रेनमध्ये एमबीबीएस कोर्सचा कालावधी ६ वर्ष आहे. ज्यानंतर २ वर्ष इंटर्नशिप करावी लागते. त्यामुळे एकूण ८ वर्षांचा हा कालावधी असतो. २०२१ FMGच्या गाईडलाईन्सनुसार कोणत्याही एमबीबीएस विद्यार्थ्यांना आपला कोर्स सुरू केल्यानंतर १० वर्षांच्या आत वैद्यकीय सरावासाठी अर्ज करावा लागतो.

अशात विद्यार्थी १ ते २ वर्षांची विंडो असते, ज्यादरम्यान भारतात मेडिकल प्रॅक्टिससाठी अर्ज करू शकतात. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांजवळ कोर्स पूर्ण करण्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण नाहीये किंवा अशी कोणतीही माहिती नाही की, सुटलेला कोर्स केव्हा पूर्ण होईल? किंवा पूर्ण होईल की नाही? जर एमबीबीएस अॅडमिशननंतर कोर्स आणि इंटरर्नशिप पूर्ण करण्यात १० वर्षांपेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे परतलेल्या विद्यार्थ्यांची एमबीबीएसची पदवीही वाया जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

आता विद्यार्थ्यांकडे कोणता उपाय?

सध्या FMG विद्यार्थ्यांसाठी भारतीय युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशनसाठी कोणतीही तरतूद नाही आहे. सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसाठी ‘लेटरल एंट्री’सारखा नवा नियम आणला जाण्याची शक्यता आहे. माहितीनुसार एनएमसी अधिकाऱ्यांनी जोपर्यंत काही निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना संयम राखण्यास सांगितले आहे.


हेही वाचा – Ukraine Russia War: रशियाकडून अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी, तिसऱ्या महायुद्धाबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचे मोठे विधान


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -