Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश यह है 'नया J&K' म्हणत, उमर अब्दुल्ला यांची नजरकैदेवर टीका

यह है ‘नया J&K’ म्हणत, उमर अब्दुल्ला यांची नजरकैदेवर टीका

Related Story

- Advertisement -

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेता फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना त्यांच्या राहत्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. उमर अब्दुल्ला यांनी रविवारी एक ट्विटर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आम्हाला आमच्या घरात कोणत्याच कारणाशिवाय घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इतकच नव्हे तर माझ्या वडिलांसह मलाही घरात बंद करण्यात आले आहे. त्यापाठोपाठच त्यांनी माझी बहिण आणि तिच्या मुलांनाही घरात बंद ठेवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, इंटेलिजन्स रिपोर्ट नुसार या नेत्यांचा संचार असणे ठिक राहणार नाही. म्हणूनच त्यांना घरातच नजरकैदैत ठेवण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्याच्या घटनेला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही खबरदारी घेण्यात आली आहे.

- Advertisement -

तुमच लोकशाहीच हे नव मॉडेल आहे, ज्यामध्ये कोणत्याच कारणाशिवाय तुम्हाला नजरकैदेत ठेवण्यात येते. माझ्या घरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही येऊ दिले जात नाहीए. याआधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या महबूबा मुफ्ती यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. खोट्या एन्काऊंटरमध्ये मारण्यात आलेल्या अतहर मुश्ताक यांच्या कुटुंबाशी भेट घेण्यापासूनही रोखण्यात आल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे. सरकारचे काही लोक आले आणि मला बाहेर जाण्यापासून रोखण्यात आले. मी याबाबतचे कारण विचारले तेव्हा ते गप्प राहिले. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना नजरबंदीतून मुक्त केल्यानंतर ते २४ मार्च २०२० रोजी आपल्या घरी परतले होते. उमर यांना ५ ऑगस्ट ते २०१९ रोजी अनुच्छेद ३७० नुसार जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते.


- Advertisement -

हे ही वाचा – पुलवामाचा हल्ला न विसरता येण्यासारखाच – पंतप्रधान


 

- Advertisement -