घरट्रेंडिंगपीपीई किट घालून कोरोना वॉरियर मागतोय भीक

पीपीई किट घालून कोरोना वॉरियर मागतोय भीक

Subscribe

कोरोनाच्या महामारित फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना वॉरिअर्सवर आता मात्र रस्त्यावर फिरुन भीक मागण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या काळात सर्वात महत्त्वाची कामगिरी आरोग्य सेवकांनी बजावली. ज्यांना आपण कोरोना वॉरिअर्स म्हणून संबोधतो. कोरोनाच्या महामारित फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना वॉरिअर्सवर आता मात्र रस्त्यावर फिरुन भीक मागण्याची वेळ आली आहे. ओडिसामध्ये रस्त्यावर पीपीई किट घालून फिरणाऱ्या कोरोना वॉरिअरच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. ही एक महिला असून गेली अनेक दिवस ती ओडीसाच्या रस्त्यावर पीपीई किट घालून भीक मागताना दिसत आहे. ही महिला ANM वर्कर आहे. ओडीसाच्या भद्रक येथे ती पीपीई किट घालून भिक मागताना समोर आली आहे. कोरोनाच्या काळात अनेक जणांना प्रायोगित तत्वावर सरकारी कामांसाठी घेतले गेले होते. मात्र कोरोनाची परिस्थिती सुधारताच त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. केलेल्या करारानुसार मुदत संपल्यानंतर महिलेला कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे ही महिला बेरोजगार झाली आणि आता ती आपलं पोट भरण्यासाठी रस्त्यावर भिक मागत आहे.

अश्विनी पाढे असे या महिलेचे नाव आहे. ही महिला सध्या एका दुकानातून दुसऱ्या दुकानात भिक मागत फिरत आहे. कोरोना महामारिच्या काळात वैद्यकिय सेवा देणाऱ्या सर्वांची परिस्थिती खूप खराब होती. त्यावेळीस आम्हाला कोरोना व्हॉरिअर्स म्हणून काम देण्यात आले. आमच्या कामासाठी आमचे खूप कौतुक करण्यात आले, आमच्यावर अक्षरशा: फुलांचा वर्षांव करण्यात आला. आम्हाला आमच्या कामासाठी योग्य सन्मान करण्यात आला. कोरोना सारख्या महामारीत काम करताना आम्ही आमची कुटुंबही धोक्यात घातले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसे कामही गेले,असे अश्विनी यांनी सांगितले.

- Advertisement -

सलग दहा महिने काम केल्यानंतर सरकारने आम्हाला काहीच कल्पना न देता कामावरुन काढून टाकले. सरकार जर आम्हाला कायमस्वरुपी नोकरी आणि पगार देऊ शकत नसेल तर त्यांनी माझ्यासारख्या अनेक बरोजगार लोकांच्या आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला सामील करुन घ्यावे, असेही अश्विनी यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – हा आहे ३६ कोटींचा कुत्रा!

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -