घरदेश-विदेशUnlock 4.0: अनलॉक ४ काय सुरू होणार?

Unlock 4.0: अनलॉक ४ काय सुरू होणार?

Subscribe

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यातच देशातील आतापर्यंत ३० लाख ४४ हजार ९४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर या जीवघेण्या रोगामुळे आतापर्यंत ५६ हजारांपेक्षा लोकांचा जीव घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता हळूहळू देशातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे.  कोरोनाच्या संकटामुळे सरकारनं संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला होता. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात आहे. आता १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. त्यातच आता देशात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ सुरू होणार असल्यामुळे या टप्प्यामध्ये केंद्राकडून अनेक गोष्टी सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

‘या’ गोष्टी होऊ शकतात सुरू…

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार १ सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची घोषणा केली.

- Advertisement -

१ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वार मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. या काळात मेट्रोच्या एका बोगीमध्ये केवळ ५० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असणार आहे. मुंबईत यापूर्वीच अत्यावश्यक सेवेती कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना अजूनही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्रानेच सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांना प्रवासी, माल वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिल्यानं राज्याराज्यातील आणि जिल्ह्यांतील प्रवासी वाहतूकीचे मार्ग खुले होण्याची शक्यता जास्त आहे. १ सप्टेंबरपासून हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

अनेक राज्यांनी शाळा बंदच ठेवल्या. केंद्रीय पातळीवर मागील काही दिवसांपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेणं सुरू असून, १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. तसेच हवाई प्रवासी वाहतूक अंशतः सुरू करण्यात आलेली आहे. ती कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्यानं हवाई प्रवासी वाहतूक विस्तारण्याचा निर्णय सध्यातरी टाळला जाऊ शकतो.


कोरोनावरील लस येण्यास डिसेंबर उजाडणार – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -