Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी ब्राझिलमध्ये सत्तांतरानंतर राष्ट्रपती भवनावर हल्ला, 400 जणांना अटक

ब्राझिलमध्ये सत्तांतरानंतर राष्ट्रपती भवनावर हल्ला, 400 जणांना अटक

Subscribe

श्रीलंकेत सरकारच्या विरोधातील उद्रेक रस्त्यांवर पाहायला मिळाला होता. नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती ब्राझीलमध्ये देखील झाली आहे. ब्राझीलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी 400 जणांना अटक करण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती भवनात धूडगूस घातला आहे. त्यामुळे बोल्सोनारो यांच्या 400 समर्थकांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत लुला डा सिल्व्हा यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. तर या निवडणुकीत बोल्सोनारो यांचा पराभव झाला होता. तेव्हापासूनच बोल्सोनारो समर्थकांमध्ये असंतोष धुमसत होता आणि अखेर तोच काल रस्त्यावर उतरला. त्यांचा पराभव हा त्यांच्या समर्थकांना मान्य नाहीये. त्यामुळे राष्ट्रपतीपदावर बोल्सोनारो यांना बसवा, अशी त्यांची मागणी होती. परंतु हजारो समर्थकांनी आधी राष्ट्रपती भवनासमोर धरणं आंदोलन सुरु केलं. तसेच ब्राझिलचा राष्ट्रध्वज परिधान करुन सुमारे दहा हजार समर्थक एकवटले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

- Advertisement -

काही कालावधीत समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी हेलिकॉप्टरद्वारे आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण आंदोलक इतके आक्रमक झाले की, त्यांनी सुरक्षा रक्षकांनाच पळवून लावलं आणि अखेर राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. दरम्यान, 12 तास उलटून गेल्यानंतर सुरक्षा यत्रणांना राष्ट्रपती भवनाला आंदोलकांपासून मुक्त करण्यात यश मिळाले. त्याचप्रमाणे आतापर्यंत 400 समर्थकांना अटक करण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलियातील राज्य संस्थांविरोधात दंगल आणि तोडफोड झाल्याच्या बातम्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लोकशाही परंपरांचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा : 21 शतकात खाकी हाफपँट घालणारे कौरव, राहुल गांधी यांचा आरएसएसवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -