घरताज्या घडामोडीAttack on Owaisi: AIMIM च्या ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांची कुर्बानी

Attack on Owaisi: AIMIM च्या ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांची कुर्बानी

Subscribe

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत राज्यसभेत निवेदन दिले.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर ३ फेब्रुवारी रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते आणि ओवेसींनी हल्लेखोरांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ओवेसींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला, परंतु संसदेत भाषण देताना ओवेसींनी झेड सेक्युरिटी स्वीकारली नाही. हल्ल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसींचे समर्थक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादच्या एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांची कुर्बानी दिली. यादरम्यान एआयएमआयएमचे एक आमदार, काही नेते आणि समर्थक उपस्थितीत होते.

- Advertisement -

दरम्यान हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसींनी लोकसभेत भाषण दिले होते आणि त्यांनी झेड सेक्युरिटी स्वीकारली नाही. ओवेसी म्हणाले होते की, ‘मी मृत्यूला घाबरत नाही. मला झेड सेक्युरिटी नाही पाहिजे आणि मी ती स्वीकारत नाही. मला ए श्रेणीचा नागरिक बनवा. मी गप्प बसणार नाही, न्याय द्या. त्या हल्लेखोरांवर यूएपीएल कलम लावा.’ पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ओवेसींनी तात्काळ सुरक्षा स्वीकारावी जेणेकरून आम्ही चिंतामुक्त होऊ असे म्हटले. आज अमित शाह यांनी ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत राज्यसभेत निवेदन दिले.

नेमकी काय घटना घडली? 

३ फेब्रुवारी रोजी दुपारी संध्याकाळी ५.२० वाजता खासदार असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशातील मेरठमधील कार्यक्रम संपल्यावर दिल्लीकडे येत होते. छिजारसी टोल प्लाझा जवळ त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये ओवेसींना कोणती इजा झाली नाही, परंतु त्यांच्या गाडीच्या खालच्या बाजूला ३ गोळा लागल्या असल्याची खूण आहे. तीन प्रत्यक्षदर्शींनी घटना पाहिली आहे. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ३७० अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Asaduddin Owaisi Attack: गोळीबारानंतर ओवेसी गरजले, मला Z+…, म्हणाले घुटमळत आयुष्य….


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -