घरदेश-विदेशधक्कादायक! प्रेयसीच्या ॲसिड हल्यात प्रियकराचा मृत्यू

धक्कादायक! प्रेयसीच्या ॲसिड हल्यात प्रियकराचा मृत्यू

Subscribe

उत्तरप्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरल्याने एका तरूणीने आपल्या प्रियकरावर हल्ला करत त्याच्या अंगावर अॅसिड ओतले. या प्रकारात त्या तरूणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय. आपल्या प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याने संतप्त झालेल्या प्रेयसीने आपल्या प्रियकराला तिच्या घरी बोलवून घेतले आणि त्याच्यावर अॅसिड ओतले. यावेळी तो गंभीर जखमी झाला. तडफडणाऱ्या या तरूणाने तिच्या घरातच जोरजोरात आरडा-ओरडा केली. याघटनेत तरूणाचा आवाज ऐकताच शेजारच्यांनी तरूणीच्या घरात धाव घेतली. त्यानंतर तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

असा घडला प्रकार

या घटनेतील तरूणीने तिच्या घरातील पंखा बिघडल्याने तिने आपल्या प्रियकराला तो दुरूस्त करण्याच्या बहाण्याने त्याला घरी बोलावले. यावेळी तरूणीने त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. या घटनेनंतर या आरोपी तरूणीला पोलिसांनी अटक केली असून या हल्ल्यात तिच्या अंगावर अॅसिड पडल्याने ती देखील गंभीर जखमी झाली. त्यामुळे सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी तरूणीचे नाव सोनम असून ती पेशाने नर्स आहे. तर पीडित तरूण देवेंद्र असून तो आग्र्यातील एका लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करतो. तो उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे राहणारा रहिवासी होता. गेल्या काही दिवासांपासून देवेंद्र आणि सोनम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र देवेंद्रचं लग्न ठरल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. तरूणाचं लग्न ठरले होते तरी ते एकमेकांच्या संपर्कात होते. असे असले तरी तरूणीने रागाच्या भरात तिच्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -