घरदेश-विदेश'आम्ही कैक सर्जिकल स्ट्राईक केले, पण मतांचा जोगवा नाही मागितला'

‘आम्ही कैक सर्जिकल स्ट्राईक केले, पण मतांचा जोगवा नाही मागितला’

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे फार कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र सैनिकांच्या शौर्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदुस्तान टाइम्सला मनमोहन सिंह यांनी मुलाखत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१६ मधील आणि आता बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा वापर मतांचा जोगवा मागण्यासाठी करत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच युपीएच्या काळात आम्ही देखील कैक सर्जिकल स्ट्राईक केले. पण त्याची जाहीरात किंवा मते मिळवण्यासाठी आम्ही त्या स्ट्राईकचा वापर केला नाही.

मनमोहन सिंह म्हणाले की, “युपीएच्या काळात अनेक सर्जिकल स्ट्राईक झाले होते. लष्करी कारवाई ही आमच्यासाठी रणनीतीचा भाग होती. देशाच्या विरोधातील शक्तींना चोख उत्तर देण्यासाठी अशा कारवाया केल्या गेल्या होत्या. मात्र मोदी सरकार भारतीय सैनिकांचा वापर मत मागण्यासाठी करत आहेत. मागच्या ७० वर्षातील सरकार कधीही सैन्यांच्या शौर्यामागे लपलेले नाही. लष्काराचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर हा दुर्दैवी असून तो स्वीकारण्यासारखा नाही.”

- Advertisement -

मनमोहन सिंह पुढे म्हणाले की, लष्कराच्या शौर्याच्या आडून मोदी सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था, कृषि विकास खालावला आहे, बेरोजगारी वाढली आहे. मात्र मोदी सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली रिकामा रथ हाकत असल्याची टीका मनमोहन सिंह यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -