घरदेश-विदेशउत्तरप्रदेशात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू तर १४ हून अधिक...

उत्तरप्रदेशात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू तर १४ हून अधिक जखमी

Subscribe

सध्या पोलिस प्रशासन आणि इतर तपास यंत्रणांकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

उत्तरप्रदेशातील गोंडा शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, येथील दोन दुकाने जमीनदोस्त झाली आहे. या जमीनदोस्त दुकानांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या जखमींना उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जिल्ह्याचे एसपी संतोष कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामुळे ही दुकानं पत्त्यासारखी कोसळली.

- Advertisement -

गोंडा जिल्ह्यातील वजीर गंज परिसरातील टीकारी गावात ही घटना घडली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅस सिलेंडर स्फोटात एकापाठोपाठ एक दुकाने पडू लागली. या घटनास्थळावरून १४ लोकांना रेस्क्यू करण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सात जणांना मृत घोषित करण्यात आवे आहे.
सध्या पोलिस प्रशासन आणि इतर तपास यंत्रणांकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. तसेच या ढिगाऱ्यात अन्य कोणी लोक गाढले गेले नाहीत ना याचा शोध घेतला जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -